Tarun Bharat

राजधानी दिल्लीत विकेंड कर्फ्यू जारी : अरविंद केजरीवाल

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


राजधानी दिल्लीत वाढत चाललेली कोरोनाची रुग्ण संख्या आणि बिघडत चाललेली परिस्थिती लक्षात घेत केजरीवाल सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 


याबाबत माहिती देताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, दिल्लीतील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन राजधानीत विकेंड कर्फ्यू जारी करण्यात आला आहे. ते म्हणाले, दर आठवड्याला शुक्रवारी रात्री 10 ते सोमवारी सकाळी 6 या काळात हा कर्फ्यू असणार आहे. तसेच दिल्लीकरांना सतर्क रहा आणि नियमांचे पालन करा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.


पुढे ते म्हणाले, सद्य स्थितीत दिल्लीतील रुग्णालयात बेडची कमतरता नाही आहे. ताज्या आकडेवारीनुसार, सध्या 5 हजार पेक्षा अधिक बेड उपलब्ध आहेत. 


पुढे ते म्हणाले, विकेंडमध्ये कर्फ्यूमध्ये आवश्यक सेवा सुरू राहणार असून या अंतर्गत येणाऱ्या नागरिकांना पास दिले जाणार आहेत. या दरम्यान मॉल, जिम, स्पा आणि सभागृहे बंद असणार आहेत.

तसेच दिल्लीतील थिएटर सुरू असतील मात्र, ही थिएटर केवळ 30 % क्षमतेने चालू असतील. हॉटेल देखील सुरू ठेवण्यात येणार आहेत. मात्र, हॉटेलमध्ये बसून खाण्यास परवानगी नसेल केवळ पार्सल सुविधा सुरू ठेवण्यात आली आहे. 

Related Stories

कोरोना विरोधातील देशाचा ‘नायक’

Patil_p

शरद पवारांच्या उपस्थितीत कुकडी संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

Archana Banage

मुंबई : धारावीत 20 नवे कोरोना रुग्ण, दोन जणांचा मृत्यू

Tousif Mujawar

जगातील सामर्थ्यवान महिलांमध्ये एंजेला मार्केल प्रथम स्थानी

datta jadhav

दिल्लीत मागील 24 तासात 239 नवे कोरोना रुग्ण

Tousif Mujawar

पंतप्रधान मोदींच्या हस्ते 71,000 नियुक्तीपत्रे दिली जाणार

Patil_p
error: Content is protected !!