Tarun Bharat

राजन तेली यांचा राजीनामा नामंजूर

Advertisements

कणकवली / प्रतिनिधी-

भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी राजन तेली हेच यापुढेही कार्यरत राहणार आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर श्री तेली यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठविलेला राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे. पाटील यांनी राजन तेली यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपले दि. ३१ डिसेंबर २०२१ रोजीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदाचे राजीनामा पत्र प्राप्त झाले. आपला राजीनामा अस्वीकारार्ह आहे. आपल्या नेतृत्वात स्थानिक संस्था, सहकार क्षेत्रातील निवडणुकांमध्ये भरीव यश प्राप्त झाले तसेच संघटनात्मक वाढ ही झाली आहे. त्यामुळे भविष्यातही आपल्या नेतृत्वात निवडणुका लढवून त्यात भरघोस यश प्राप्त होईल, असा आम्हाला विश्वास आहे.

Related Stories

आदर्श शाळा पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार ऑनलाईन

Patil_p

वेताळ प्रतिष्ठानच्या मार्फत वेळागर किनाऱ्याची स्वच्छता

Anuja Kudatarkar

..अन् जुन्या आवडींना सवड मिळाली!

Patil_p

जिल्हय़ात 35 हजार चाकरमानी दाखल

NIKHIL_N

मळगांव घाटीतील मोरीचे बांधकाम अंतिम टप्यात

Anuja Kudatarkar

सिंधुदुर्गनगरीत आशांचा एल्गार

NIKHIL_N
error: Content is protected !!