Tarun Bharat

राजपत्रित अधिकारी महासंघाकडून 100 पीपीई किट पालकमंत्र्यांकडे सुपूर्द

प्रतिनिधी / कोल्हापूर

आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी अहोरात्र सेवा बजावत कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटावर मात करत आहेत. अशा आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सुरक्षा कवच असणारे पीपीई किट्सचे 100 नग कोल्हापूर विभागाच्या राजपत्रित अधिकारी महासंघातर्फे आज पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे देण्यात आले.

राजपत्रित अधिकारी महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई यांच्या कल्पनेतून व कोल्हापूर विभागातील राजपत्रित अधिकारी महासंघाचे अधिकारी यांच्या सहकार्यातून हे 100 पीपीई किट खरेदी करून पालकमंत्री श्री. पाटील यांच्याकडे आज देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, महासंघाचे उपाध्यक्ष संजय शिंदे, सचिव बजरंग मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे वस्तू व सेवा कर अधिकारी संघटनेचे सहसचिव राजकुमार पाटील, वस्तू व सेवा कर विभागाचे सहाय्यक राज्यकर आयुक्त राजेंद्र पाटील, वस्तू व सेवा कर विभागाचे राज्यकर अधिकारी कृषी अधिकारी तथा पालकमंत्र्यांचे स्वीय सहायक अतुल जाधव, प्रवीण मगदूम आदी उपस्थित होते.

Related Stories

लाडक्या बाप्पांना दिला निरोप

Patil_p

उदयनराजेंना अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची मागणी

datta jadhav

सडेगुडवळेत टस्कराचे आगमन भात, ऊसाचे प्रचंड नुकसान

Archana Banage

कोडोलीतील शतकोत्तर नाताळची परंपरा यावर्षी साधेपणाने

Archana Banage

गांधीनगरमधील तीन विनापरवाना बांधकामांवर कारवाई, उर्वरित कारवाई अटळ

Archana Banage

मुंबईसह राज्यभरात पावसाची जोरदार हजेरी

Tousif Mujawar