Tarun Bharat

राजपथावर येणाऱ्यांसाठी सरकारकडून प्रोटोकॉल

Advertisements

15 वर्षांखालील मुलांना प्रवेश नाही, कोरोना नियमावलीचे पालन करणे बंधनकारक

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

प्रजासत्ताक दिनाच्या सोहळय़ात सहभागी होणाऱयांसाठी सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार, ज्यांना अद्याप लस नाही, त्यांना यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळय़ात सहभागी होता येणार नाही. याशिवाय 15 वर्षांखालील मुलांनाही राजपथावरील संचलन सोहळय़ामध्ये सहभागी होता येणार नाही. दिल्ली पोलिसांनी यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळय़ासाठी कोविडच्या प्रत्येक प्रोटोकॉलचे पालन करणे बंधनकारक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. राजपथ येथे प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात मास्क घालणे अनिवार्य असून शारीरिक अंतर राखण्याची काळजी घ्यावी लागेल.

लसीचे प्रमाणपत्रही आणणे बंधनकारक

नव्या मार्गदर्शक तत्त्वानुसार समारंभात सहभागी होणाऱयांनी लसीचे प्रमाणपत्र आणणे बंधनकारक आहे. 15 वर्षांखालील मुलांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची परवानगी नाही. सहभागींसाठी बसण्याची जागा सकाळी 7 वाजता उघडली जाईल. यावेळी पोलिसांनी अभ्यागतांना प्रवेशपत्रासोबत वैध ओळखपुरावा (आधार कार्ड, मतदार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इ.) आणण्याची विनंती केली आहे.

Related Stories

दिल्ली हिंसाचार : दंगेखोरांना दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

tarunbharat

तीन कोटी रेशनकार्ड रद्द ही अत्यंत गंभीर बाब

Patil_p

वृंदावनमध्ये होळी उत्सव सुरू

Patil_p

तीन वर्षात 400 ‘वंदे भारत’ ट्रेन धावणार

datta jadhav

दिल्लीत आजपासून 45 पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांसाठी ‘जहां वोट, वहां वैक्सिनेशन’ अभियान

Rohan_P

मध्यप्रदेशात मंत्रिमंडळ विस्तार; पाच मंत्र्यांनी घेतली शपथ

prashant_c
error: Content is protected !!