Tarun Bharat

राजर्षी शाहू समाधी स्मारकाचे आज लोकार्पण 

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

येथील नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू समाधी स्मारकाचा लोकार्पण सोहळा रविवार होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता स्मारक लोकार्पण होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आहेत. या सोहळय़ासाठी समस्त करवीरनगरी सज्ज झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे शहरातील वातावरणही शाहूमय झाले आहे. समस्त करवीरवासियांनी सोहळय़ामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर ऍड. सूरमंजिरी लाटकर यांनी केले आहे.  

   महापालिका प्रशासनाने नर्सरी बागेत स्वनिधीतून सुमारे तीन कोटी रुपये खर्च करुन राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे समाधी स्मारक उभारले. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. स्मारकाचा लोकार्पण सोहळय़ासाठी महापालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. आकर्षक फुले, फुलांच्या माळांनी समाधी स्मारक व परिसराची सजावट करण्यात आली आहे. तसेच आकर्षक विद्युत रोषणाईच्या झगमगटाता परिसर उजळून निघाला आहे.

शाहू जन्मस्थळपासून समता ज्योत रॅली 

 लोकार्पण सोहळय़ापुर्वी राजर्षी शाहू सलोखा मंचतर्फे शाहू समता ज्योत रॅली काढण्यात येणार आहे. सकाळी 9 वाजता कसबा बावडा येथली शाहू जन्मस्थळावरुन रॅलीस प्रारंभ होईल. समाधी स्मारकस्थळी रॅलीची सांगता होईल. यानंतर सकाळी अकरा वाजता स्मारक स्थळाचा लोकार्पण सोहळा होईल. यावेळी शाहू मॅरेथॉन तर्फे क्रीडा ज्योत रॅली काढण्यात येणार आहे.  शाहू समाधी स्मारक स्थळापासून क्रीडाज्योतला प्रारंभ होईल. दसरा चौक, बिंदू चौक, मिरजकर तिकटी मार्गे बिनखांबी गणेश मंदीर येथे क्रीडा ज्योत रॅलीची सांगता होणार आहे. यानंतर ऐतिहासिक दसरा चौक मैदानात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सभा होणार आहे. सभेसाठी येथे भव्य मंडप उभारण्यात आला आहे. दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

  समस्त करवीरकरांनी उपस्थित रहावे पालकमंत्री सतेज पाटील

  राजर्षी शाहू महाराज यांनी  नर्सरीबागेत आपली समाधी व्हावी, अशी  इच्छा स्वतः व्यक्त केली होती. आज सुवर्णदिनी लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीचा लोकार्पण सोहळा होत आहे. राजर्षी शाहूंनी दिलेल्या समतेच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत. जिह्याचा पालकमंत्री म्हणून  हा सोहळा होताना मला विशेष आनंद होत आहे. या  सोहळयास संपूर्ण करवीरवासियांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे.

Related Stories

…अखेर त्या गव्याचा मृत्यू

Sumit Tambekar

अत्यवस्थ रूग्णांना सर्वप्रथम दाखल करावे – ग्रामविकास मंत्री मुश्रीफ

Abhijeet Shinde

दुकाने बंद ठेवून व्यापाऱयांनी कर कसा भरायचा? : धनंजय महाडिक

Abhijeet Shinde

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून हैदोस सुरू : आमदार चंद्रकांत पाटील

Abhijeet Shinde

सदस्य नोंदणीत जिल्हा शिवसेना मागे का ?

Abhijeet Shinde

ग्रेस गुणाबाबत शासन सकारात्मक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!