Tarun Bharat

राजवाडा युनियन भाजी मंडईत शुकशुकाट

प्रतिनिधी/ सातारा

सातारा पालिकेने राजवाडा परिसरातील भाजी विक्रेते, फळ विक्रेत्यांना मुळच्या असलेल्या राजवाडा युनियन भाजी मंडईसाठी कोटय़ावधी रुपये खर्च करुन प्रशस्त अशी इमारत बांधून तेथे कट्टे देण्यात आले. परंतु त्या कटय़ावर फळ विक्रेते व भाजी विक्रेते बसायलाच तयार नाहीत. त्यामुळे या मंडईत शुकशुकाट जाणवत असून राजवाडा परिसरात रस्त्याच्या कडेने कोणीही कशीही आपली दुकाने लावत असल्याने रस्त्यावर तोबा गर्दी होताना पहायला मिळत आहे. युनियन भाजी मंडईच्या तळ मजल्यात बारा भानगडी सुरु असल्याचे अनेकांनी पाहिले आहे.

राजवाडा परिसरात दोन भाजी मंडई आहेत. एक मंडई तात्कालिन नगराध्यक्ष अशोक मोने यांच्या कार्यकाळात सदाशिव पेठेत महात्मा फुले भाजी मंडई बांधण्यात आली. तर दुसरी मंडई राजवाडा बसस्थानकाच्या पाठीमागे 2014 साली बांधण्यात आली. ही मंडई पूर्वी साध्या पद्धतीची बैठय़ा जागेत बसत होती. परंतु तेथे प्रशस्त अशी इमारत बांधण्यात आली. त्या इमारतीत भाजी विक्रेते, फळ विक्रेत्यांना कट्टे बांधण्यात आले. या कटय़ांचे वाटपही करण्यात आले. अगदी तळमजल्यात पार्किंगची सोय करण्यात आली. परंतु मंडईत मोजकेचे भाजी विक्रेते ज्यांची जागा पुढे आहे असेच बसतात. वरचा मजला पूर्णत रिकामा असून खालच्या मजल्यावरील कट्टे 40 टक्के रिकामे आहेत. तळ मजल्यामध्ये भाजी विक्रेत्यांच्या गाडय़ा लावलेल्या असल्या तरीही काही लोक दारु पिणारे असतात. अश्लिल चाळे करणारे जोडपीही असतात, असेही प्रकार सर्रास घडत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

दरम्यान, राजवाडा ते मंगळवार तळे या रोडवर सतत रहदारी असते. वाहतूकीची कोंडी होत असते. ज्या दिवशी अतिक्रमण हटावची गाडी जाते. तेव्हाच रस्ता खुला दिसतो. त्यामुळे सदर प्रकरणी पालिपे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

Related Stories

स्पुटनिक व्ही लस 20 दिवसांपासून आलीच नाही

Patil_p

सोनगावमध्ये बिबट्याने केल्या कोंबड्या फस्त

datta jadhav

मनसेचा माजी कोरेगाव तालुका प्रमुख वैभव ढाणे याचा निर्घृण खून

datta jadhav

महापालिका निवडणुकीत शिंदे-भाजप एकत्र, ‘या’ महापालिकेत युतीचा नारळ फुटला

Rahul Gadkar

सातारा : राम मंदिर पायाभरणी विरोधात लक्ष्मण माने यांचे आंदोलन

Archana Banage

सातारा शहर, परिसरात पाच बाधित

Archana Banage