Tarun Bharat

राजवाडा साफसफाईचे राजमाता कल्पनाराजेचे आदेश

दोन दिवस सुरू आहे सफाई

प्रतिनिधी/ सातारा

राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या देखरेखीखाली येथील राजवाडय़ाची गेले दोन दिवस साफसफाई सुरू आहे. या सफाईदरम्यान दोन ट्रकहून अधिक कचरा आणि इतर घाण बाहेर काढण्यात आली.

ऐतिहासिक राजवाडय़ात यापूर्वी जिल्हा न्यायालयासह इतर शासकीय कार्यालये भरत होती. नंतरच्या काळात ही कार्यालये इतरत्र स्थलांतरित करण्यात आली. जिल्हा न्यायालय स्वतःच्या इमारतीत गेल्यापासून राजवाडय़ातील नागरिकांचा वावर कमी झाला. वावर नसल्याने नंतरच्या काळात राजवाडय़ात चोरटय़ांनी धुमाकुळ घालत अनेक ऐतिहासिक वस्तू चोरून नेण्यास सुरूवात केली. चोरटय़ांमुळे ठेवा नामशेष झाला. यामुळे हा राजवाडा ताब्यात देण्याची मागणी राजमाता कल्पनाराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी शासनाकडे केली. यावरील प्रक्रिया प्रलंबित असून, ऐतिहासिक राजवाडय़ाचे वैभव जपण्यासाठी राजमाता कल्पनाराजे भोसले सरसावल्या आहेत. गेले दोन दिवस त्यांच्या देखरेखीखाली राजवाडय़ाची साफसफाई सुरू असून, त्यामुळे दरबार हॉलसह इतर भाग चकाचक झाला आहे.

Related Stories

गडचिरोलीत दोन जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

datta jadhav

भंडारा दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तात्काळ चौकशीचे आदेश

Tousif Mujawar

कोल्हापूर : अखेर पाचगावमध्ये कोरोनाचा शिरकाव

Archana Banage

भाजपच्या दबावामुळेच अन्वय नाईकची आत्महत्या

datta jadhav

शाळा दिवाळीनंतरच

Archana Banage

मोदी-ठाकरे भेटीतून मराठा आरक्षणावर नक्कीच तोडगा निघेल ; संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास

Archana Banage