Tarun Bharat

राजवाडय़ाची चौपाटी आता बसणार दोन ठिकाणी

Advertisements

मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या पाठीमागच्या कार्यकाळात झाला होता निर्णय

प्रतिनिधी/ सातारा

सातारा शहरात राजवाडा चौपाटीवर गेल्यावर खवय्यांना पाणी पुरी पासून मेदू वडापर्यंत ते कांदा भजी पासून मिसळ पर्यन्त सार काही मिळत.मात्र येथे दररोज होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे व हेरिटेज वास्तूच्या समोर हातगडे लावता येत नसल्याने तक्रारी झाल्याने पालिका प्रशासनाने ही चौपाटी दोन ठिकाणी हलवण्याचा निर्णय पाठीमागे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याच कार्यकाळात झाला होता.आता ते परत आल्याने त्यास पुन्हा कार्यवाही करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून येत्या काही दिवसात दोन ठिकाणी ही चौपाटी दिसणार आहे.

सातारच्या राजवाडा चौपाटीबाबत जेवढे चांगले सांगता येते तेवढंच वाईट ही सांगता येते.या चौपाटीवर एकूण 70 हातगाडी आहे.काही भाडय़ाने दिलेले तर काही स्वतः मालक व्यवसाय करतात.येथे अगदी चायनीजपासून पाणी पुरी पर्यन्त पदार्थ मिळतात.तसेच चौपाटीवर फळ विक्री करणारे, किरकोळ कटलरी स्टेशनरी विकणारे हातगाडे आहेत.त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने पाठीमागे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याच काळात झालेल्या तक्रारीवरून ती चौपाटी दोन ठिकाणी हलवण्याचा प्रस्ताव तयार केला होता.70 पैकी 40 हातगाडी एका ठिकाणी तर उरलेले दुस्रया ठिकाणी हलवण्याच्या आराखडा तयार करण्यात आला होता.आता त्याचे प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार आहे.त्यामुळे येत्या काही दिवसात चौपाटी मोकळी पहायला मिळणार आहे.

Related Stories

महाराष्ट्रात मागील 24 तासात 6,686 नवे कोरोना रुग्ण; 158 मृत्यू

Rohan_P

एटीएम कॅश व्हॅन घेऊन चालक फरार

datta jadhav

Sangli; जत तालुक्यातील कुडणुरात दुसऱ्यांदा सापडला हॅंडग्रेनेड बॉम्ब

Abhijeet Khandekar

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना सावधानतेचा इशारा

Sumit Tambekar

सर्वसमावेशक ग्रामपंचायत विकास आराखडे तयार करावे – विनय गौडा

Abhijeet Shinde

कोरोना जनजागृतीसाठी बार्शीत पोलिसांचा रूट मार्च

Abhijeet Shinde
error: Content is protected !!