Tarun Bharat

राजर्षी शाहू गव्हर्मेंट बँक निवडणुक; सत्तारूढ पॅनल ९ जागांवर आघाडीवर

कोल्हापूर / प्रतिनिधी

राजश्री शाहू गव्हर्मेंट बँकेच्या दुपारी एक पर्यंत ४५०० मतदानाची मतमोजणी पूर्ण झाली. अत्‍यंत चुरशीने झालेल्‍या या निवडणुकीमध्ये सत्तारूढ व परिवर्तन पॅनल मध्ये शंभर ते दीडशे मतांच्या फरकाने सत्तारूढ पॅनेल आघाडीवर आहे. .एक वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणी मध्ये सत्तारूढ पॅनेल नऊ जागांवर आघाडीवर असून एका जागेवर परिवर्तन पॅनेलआघाडीवर आहे. आतापर्यंत ४५०० मतदानाची मोजणी झाली आहे.
|
राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस को-ऑप. बँकेसाठीची निवडणूक रविवारी ( दि. १९) रोजी पार पडली. या निवडणुकीत २० हजार ७८८ पैकी ९२४१ मतदारांनी (४४.४५ टक्के) मतदानाचा हक्क बजावला. गव्हर्मेंट सर्व्हंटस बँकेच्या १५ जागांसाठी मतदान झाले. ‘राजर्षि शाहू सत्तारुढ पॅनेल’, ‘राजर्षि शाहू स्वाभिमानी परिवर्तन पॅनेल’ व छत्रपती शिवाजी महाराज युवा पॅनेल, अशी तिरंगी लढत झाल्याने अनेकांच्या नजरा या निकालाकडे लागल्या आहेत. बँकेचे २० हजार ७८८ मतदार मतदानासाठी पात्र होते. प्रचाराची गती व साधनांचा केलेला वापर पाहता मतदानाचा टक्का वाढेल, असे अपेक्षित होते; मात्र प्रत्यक्षात मतदारांचा प्रतिसाद कमी मिळाला. ९ हजार २४१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याने प्रचंड चुरस पाहायला मिळत आहे.

आज या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया कसबा बावड्यातील रमणमळा परिसरातील बहुउद्देशीय सभागृहात सुरु आहे. आज सकाळ पासून तीन हजार मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. साली १ पर्यंत वाजेपर्यतच्या मतमोजणीत राजर्षि शाहू सत्तारुढ पॅनेल हे आघाडीवर असल्याचे चित्र आहे. तर राजर्षी शाहू स्वाभिमानी परिवर्तन पॅनल जवळपास दीडशे मतांच्या फरकाने पिछाडीवर आहे.

Related Stories

५० वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन पिकुळे येथील श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालयात

Anuja Kudatarkar

कोल्हापूर : गोकुळ शिरगाववासीयांची गौरवला आर्त हाक…

Archana Banage

सातारा : शिवभक्तांनी मानले मंत्री देसाई यांचे आभार

datta jadhav

नरवणे खून प्रकरणी दोन्ही गटातील एकूण पाच जणांना अटक

Amit Kulkarni

पनवेलनजीक अपघातात एसटी चालकाची होती चूक

Patil_p

ग्रामीण विकास रुतला कोरोना खाईत

Archana Banage