Tarun Bharat

राजस्थानची लखनौवर मात

सामनावीर बोल्टची अष्टपैलू चमक, पडिक्कलची फटकेबाजी, हुडाचे अर्धशतक वाया

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

राजस्थान रॉयल्सने आयपीएलमधील साखळी सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा 24 धावांनी पराभव करून आठवा विजय मिळविला. दोन्ही संघांचे 13 सामन्यातून 16 गुण झाले असून प्लेऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी शेवटच्या सामन्यात दोघांनाही विजय मिळवावा लागणार आहे. या सामन्यातील विजयाच्या फरकामुळे राजस्थानने लखनौला मागे टाकत दुसरे स्थान घेतले आहे. लखनौला सुरुवातीलाच दोन धक्के देणाऱया राजस्थानच्या ट्रेंट बोल्टला सामनावीराचा बहुमान मिळाला.

प्रथम फलंदाजी निवडल्यावर देवदत्त पडिक्कल, कर्णधार संजू सॅमसन व यशस्वी जैस्वाल यांच्या फटकेबाजीमुळे राजस्थान रॉयल्सने 20 षटकांत 6 बाद 178 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. जैस्वालने 29 चेंडूत 6 चौकार, एक षटकारासह 41 तर सॅमसनने 24 चेंडूत 32 व पडिक्कलने आक्रमक फटकेबाजी करीत 18 चेंडूत 5 चौकार, 2 षटकारांच्या मदतीने 39 धावा झोडपल्या. लखनौच्या रवी बिश्नोईने 31 धावांत 2 बळी मिळविले. त्यानंतर अचूक मारा करीत राजस्थानने लखनौला 20 षटकांत 8 बाद 154 धावांवर रोखत सहज विजय साकार केला. लखनौतर्फे दीपक हुडाने सर्वाधिक 59 धावा केल्या. त्याने 39 चेंडूत 5 चौकार, 2 षटकार मारले. पण त्याला इतरांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. मार्कस स्टोईनिसने 17 चेंडूत 1 चौकार, 2 षटकारांसह 27 आणि कृणाल पंडय़ाने 23 चेंडूत 1 चौकार, 1 षटकारासह 25 धावा काढल्या तर कर्णधार केएल राहुलला केवळ 10 धावा जमविता आल्या. राजस्थानच्या ट्रेंट बोल्ट, ओबेड मकॉय, प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले तर यजुवेंद्र चहल व रविचंद्रन अश्विन यांनी एकेक बळी टिपला.

संक्षिप्त धावफलक ः राजस्थान रॉयल्स 20 षटकांत 6 बाद 178 ः जैस्वाल 29 चेंडूत 41, बटलर 2, सॅमसन 24 चेंडूत 32, पडिक्कल 18 चेंडूत 39, रियान पराग 19, नीशम 14, अश्विन नाबाद 10, बोल्ट नाबाद 17. गोलंदाजी ः बिश्नोई 2-31, होल्डर 1-12, बदोनी 1-5, अवेश खान 1-12

लखनौ सुपर जायंट्स 20 षटकांत 8 बाद 154 ः राहुल 10, दीपक हुडा 39 चेंडूत 5 चौकार, 2 षटकारांसह 59, कृणाल पंडय़ा 23 चेंडूत 25, स्टोईनिस 17 चेंडूत 27, अवांतर 15. गोलंदाजी ः बोल्ट 2-18, पी. कृष्णा 2-32, चहल 1-42, अश्विन 1-24, मकॉय 2-35.

Related Stories

चिनी प्रायोजक कायम ठेवल्याबद्दल आयपीएलविरुद्ध जनतेत संताप

Patil_p

जर्मनीच्या विजयाला पोर्तुगालचाही हातभार!

Patil_p

7 ऑगस्ट यापुढे ‘भालाफेक दिन’

Amit Kulkarni

नेमबाजी शिबीराला साईची अधिकृत मान्यता

Patil_p

स्पेनचा नदाल उपांत्य फेरीत

Patil_p

आनंद आताही मुसंडी मारुन वर येईल

Patil_p
error: Content is protected !!