Tarun Bharat

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना कोरोनाची लागण

ऑनलाईन टीम / जयपूर : 


राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली. 


ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, कोरोनाची चाचणी केली असता आज माझे देखील रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. आता माझ्यामध्ये कोणतीही लक्षणे नसून माझी प्रकृती ठीक आहे. कोविड प्रोटोकॉलचे पालन करत सध्या मी विलगीकरणात आहे आणि माझे काम सुरू आहे.

  • पत्नी सुनीता गेहलोत यांनाही कोरोनाचा संसर्ग


दरम्यान, कालच मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुनीता गेहलोत यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतःला आयसोलेट करुन घेत असल्याचे सांगितले होते. मुख्यमंत्र्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.


ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, माझी पत्नी सुनीता हिचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या तिच्यामध्ये कोणतीही लक्षणे नाही आहेत. मात्र, प्रोटोकॉलनुसार विलगीकरणात तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत, असे सांगत ते स्वतः देखील घरामध्ये विलगीकरणात होते. मात्र आज त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. 

  • राजस्थानमध्ये 16,613 नवे रुग्ण 

दरम्यान, राजस्थानमध्ये मागील 24 तासात आता पर्यंतचे सर्वाधिक म्हणजेच 16,613 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. तर 120 जणांना मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील बधितांची एकूण संख्या 5 लाख 63 हजार 577 वर पोहोचली असून यातील 3,96,279 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1 लाख 63 हजार 372 जणांवर उपचार सुरु आहेत. 

Related Stories

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा

Abhijeet Khandekar

“कुंभमेळ्याची चूक कमी म्हणून की काय आता चार धाम यात्रा”

Archana Banage

कोरोना बळींच्या कुटुंबीयांना तत्काळ भरपाई द्या

Patil_p

हरियाणात खट्टर सरकार बचावले

Patil_p

पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन

Tousif Mujawar

कुडनूर येथील बोगस भंगार उद्योगाचे मुंबई कनेक्शन

Abhijeet Khandekar