Tarun Bharat

राजस्थानमध्ये कोरोना बाधिताची संख्या 20 हजार पार

ऑनलाईन टीम / जयपूर : 


राजस्थानमध्ये मंगळवारी 9 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात मृतांची एकूण संख्या 456 इतकी झाली आहे. त्याबरोबरच 632 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर आतापर्यंत राजस्थानमधील कोरोना बाधिताची एकूण संख्या 20 हजार 164 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. 


अधिकाऱ्यांनी सांगितले की, काल झालेल्या 9 मृतांमध्ये बिकानेरमधील 1, जोधपुर 6, कोटा 1 आणि उदयपुरमधील एकाचा समावेश आहे. मंगळवारी 265 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आत्तापर्यंत 15,477 जणांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, सध्या राज्यात 3780 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


मंगळवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये अजमेर 31, अलवार 47, बरन 4, बारमेर 7, भरतपूर 34, भिलवारा 3, बिकानेर 57, चुरु 5, दाऊसा 7, धौलपूर 28,  डुंगरपूर 1, हनुमानगड 2, जयपूर 47, जलोरे 41, झलवार 3, झुंझूंन 15, जोधपूर 57, करौली 2, कोटा 8, नागौर 30, पाली 46, प्रतापगड 65, राजसमंद 37, सिकार 12, सिरोही 27, टोंक 3, उदयपूर 10 आणि अन्य 3 जणांचा समावेश आहे. 

Related Stories

अस्थि विरघळतात 72 तासांत

Patil_p

जिल्ह्याचे राजकारण योग्य वळणावर – महादेवराव महाडिक

Abhijeet Khandekar

ऋतिक सावंतची आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेसाठी तर , रोशन सावंतची फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

Anuja Kudatarkar

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; दोन पोलिस जखमी

Abhijeet Khandekar

कॅसिनो, ऑनलाईन गेमिंग महसुलावर 28 टक्के जीएसटी?

Patil_p

सीएए नियमांची एप्रिलमध्ये घोषणा शक्य

tarunbharat