Tarun Bharat

राजस्थानात बोट उलटून 14 प्रवाशांचा मृत्यू

चंबळ नदीत 40 प्रवाशांसह दुर्घटना : भाविकांवर काळाचा घाला

कोटा / वृत्तसंस्था

राजस्थानच्या कोटा जिल्हय़ात बुधवारी सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. चंबळ नदीत एक बोट उलटली. त्यामध्ये एकूण 40 प्रवासी होते. या प्रवाशांमध्ये लहान मुले आणि महिलांचाही समावेश होता. बुंदी जिह्याच्या सीमेवर गोठडा कला गावाजवळील चंबळ नदीत ही घटना घडली. या बोटीत प्रवाशांबरोबर काही सामान आणि वाहनेसुद्धा भरण्यात आली होती. प्रवासी बोटीतून कमलेश्वर धामकडे जात होते. परंतु नदीच्या मध्यभागी येताच ही बोट उलटून हा अपघात घडला. प्राप्त माहितीनुसार 25 जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर 14 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. उर्वरित एकाचा सायंकाळी उशिरापर्यंत शोध सुरु होता. सदर प्रवासी नदीच्या दुसऱया बाजूला असलेल्या मंदिरात देवदर्शनासाठी जात असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बोटीत अधिकांश ज्येष्ठ व्यक्ती, महिला आणि मुलांचा समावेश होता. यामधील बऱयाच लोकांना नीट पोहता पण येत नव्हते. ही घटना बुधवारी सकाळी 9 वाजता घडली. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने तातडीने हालचाली करत प्रवाशांना वाचवण्यासाठी बचाव मोहीम सुरू केली. तसेच एसडीआरएफच्या मदत पथकाला पाचारण करण्यात आले. या घटनेवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

Related Stories

अखिलेश यांची मयंक जोशींनी घेतली भेट

Patil_p

देशात दररोज 55 हजारांहून अधिक कोरोना टेस्ट

prashant_c

धर्मांतर पीडित शीख युवतीचा शीख युवकासोबत विवाह

Patil_p

तेलंगणात महिला अत्याचारांमध्ये वाढ; NCW ने मागितला अहवाल

Archana Banage

पश्चिम बंगालमध्ये साजरा होणार ‘खेला होबे दिवस’; ममता बॅनर्जी यांची घोषणा

Archana Banage

पंजाब सरकारने वाढवला 2 आठवडे लॉकडाऊन

datta jadhav