Tarun Bharat

राजस्थान : कॅबिनेट मंत्री प्रताप खाचरियावास यांना कोरोनाची बाधा

Advertisements

ऑनलाईन टीम / जयपूर : 


राजस्थानमधील कॅबिनेट मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली. 


ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, माझ्यामध्ये काही सौम्य लक्षणे दिसून आल्यावर मी माझी कोरोनाची चाचणी करुन घेतली. त्यात माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझे सर्वांना आवाहन आहे की, मागील काही दिवसात जे लोक माझ्या संपर्कात आले होते त्यांनी स्वतःला आयसोलेट करुन घ्यावे तसेच आपली कोरोनाची टेस्ट देखील करावी. 


राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सिंह खाचरियावास हे 28 ऑगस्ट रोजी नीट आणि जेईई परीक्षांबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात केलेल्या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनात सचिन पायलट यांच्यासह काँग्रेसचे अनेक आमदार, नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

  
दरम्यान, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्विट करत प्रताप सिंह खाचरियावास यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

Related Stories

काँग्रेसच्या बैठकीत तृणमूल भाग घेणार

Patil_p

न्यायाधीशांच्या विरोधात टिप्पणी करणाऱयांवर कारवाई

Patil_p

दिल्ली सरकार : गरजूंना मिळणार घरपोच रेशन; गव्हाऐवजी तयार पीठ देणार

Rohan_P

मंगळाच्या दिशेने चीनचे पडले पाऊल

Patil_p

अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून

datta jadhav

ऑगस्टपर्यंत प्रतिदिन 1 कोटी लसी शक्य

Amit Kulkarni
error: Content is protected !!