Tarun Bharat

राजस्थान : जयपूर विमानतळावर 14 प्रवाशांकडून 32 किलो सोने जप्त

Advertisements

ऑनलाईन टीम / जयपूर : 


जयपूर विमानतळावरील 14 प्रवाशांकडून जवळपास 32 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. या सोन्याची किंमत 15.67 कोटी इतकी आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबिया मधून शुक्रवारी दोन चार्टर विमानातून आलेल्या प्रवाशांकडून हे सोने जप्त करण्यात आले आहे. 


सांगानेर विमानतळावर तैनात सीमा शुल्क विभागाच्या टीमने तपासणी करत असताना हे सोने जप्त केले. सोन्याच्या सळ्या आणि विटा यांना विशिष्ट पद्धतीने आवरणामध्ये बंद करून त्यांना सामानात लपवले होते. अधिकाऱ्यांनी रियाध मधून आलेल्या 11 प्रवाशांकडून 22.65 किलो आणि संयुक्त अरब अमिराती मधून आलेल्या तीन प्रवाशांकडून 9.3 किलो सोने जप्त केले. 


सोन्याची पूर्ण किंमत 15.67 कोटी रुपये इतकी आहे. दरम्यान, संबधित प्रवाशांची चौकशी सुरू आहे. 

Related Stories

शिवजयंतीसाठी ठाकरे सरकारकडून नियमावली जाहीर

Rohan_P

17 वर्षांपासून ग्रामस्थांच्या ताब्यात रेल्वेस्थानक

Patil_p

जगनमोहन यांना न्यायालयाचा दणका

Patil_p

राज्यात पावसाचा जोर ओसरला

datta jadhav

जेईई मेन 2021 : चौथ्या टप्प्यातील परीक्षा स्थगित!

Rohan_P

किरकोळ महागाई दरात काहीशी घट

Patil_p
error: Content is protected !!