Tarun Bharat

राजस्थान सीमेवर पाकिस्तानी घुसखोराचा खात्मा

ऑनलाईन टीम / जयपूर :

राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील बाखसर ठाणा क्षेत्रातील बीकेडीजवळील सीमारेषेवरून मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी इसमाचा बीएसएफच्या जवानांनी खात्मा केला. 

पाकिस्तानी घुसखोर मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास बीकेडीजवळील ताराबंदीजवळ पोहचला. सीमारेषेवरील तारांचे कुंपण ओलांडून आत घुसखोरी करण्याचा तो प्रयत्न करू लागला. तेव्हा बीएसएफच्या जवानांकडून त्याला समज देण्यात आली. दोन ते तीन वेळा त्याला चेतावणी देऊनही तो परत फिरण्यास तयार नव्हता. अखेर जवानांनी त्याला शेवटचा इशारा दिला. त्याकडेही घुसखोराने दुर्लक्ष केले. त्यावेळी जवानांकडून चार राउंड फायर करण्यात आले. त्यात तो ठार झाला.

घटनेची माहिती मिळताच वरीष्ठ लष्करी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक पोलिसांना याची माहिती देऊन मृतदेह ताब्यात घेण्यात आला. हा इसम कोणत्या कारणासाठी घुसखोरी करत होता, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Related Stories

हिरो मोटोकॉर्पकडून 1000 कोटींची हेराफेरी

datta jadhav

मेघालय-नागालँडमध्ये आज विधानसभेसाठी मतदान

Patil_p

हरियाणाचे मंत्री अनिल वीज कोरोना पॉझिटिव्ह

Tousif Mujawar

हिंमत असेल तर CAA कायद्याची अंमलबजावणी थांबवून दाखवा

datta jadhav

तंतुवाद्यांसह निर्यात होणाऱ्या वस्तूवर वजन मोजून शुल्क आकारणार

Rohit Salunke

लष्करी रुग्णालये सर्वसामान्यांसाठी खुली पंतप्रधानांच्या भेटीत लष्करप्रमुखांची माहिती

Amit Kulkarni