Tarun Bharat

राजापूर-चव्हाणवाडी येथील 40 वर्षीय इसमाचा खून ?

चेहरा आणि डोक्यावर गंभीर जखमा

राजापूर प्रतिनिधी                  

राजापूर शहरातील चव्हाणवाडी येथून सोमवारी रात्रीपासून बेपत्ता असलेला 40 वर्षीय इसम रानतळे येथील सड्यावर मृतावस्थेत आढळून आला आहे. दरम्यान या मृत इसमाच्या चेहऱ्यावर तसेच डोक्यावर मारहाणीच्या खूणा असल्याने घातपाताचा संशय व्यक्त होत आहे. राजेश वसंत चव्हाण (40, राह. चव्हाणवाडी राजापूर) असे मयत इसमाचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार चव्हाणवाडी येथील सलून व्यवसायीक राजेश चव्हाण हे सोमवारी रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध घेण्याचा पयत्न केला. मात्र ते कोठेही आढळून आले नाहीत. अखेर मंगळवारी त्याच्या पत्नीने सकाळी राजापूर पोलिस स्थानकात बेपत्ता म्हणून फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा तपास केला असता राजेश याचे शेवटचे मोबाईल लोकेशन रानतळे येथे मिळाल्याने रानतळे परिसरात शोध घेण्यात आला. मंगळवारी सायंकाळी रानतळे पिकनिक स्पॉटपासून काही अंतरावर धोपेश्वर गुरववाडीकडे जाणाऱ्या रस्त्यापासून सुमारे 50 मीटर अंतरावर सड्यावर त्याचा मृतदेह आढळून आला.

या घटनेची खबर मिळताच राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर मौळे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान राजेश याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला तसेच चेहऱ्यावर जोरदार मार लागला होता. चेहऱया रक्ताने माखलेल्या स्थितीत होता. तसेच राजेशच्या मृतदेहापासून काही अंतरावर त्याचा मोबाईल फोडलेल्या अवस्थेत आढळून आला. तर मृतदेहाजवळ ग्लास व खाद्यपदार्थही आढळून आले. त्यामुळे राजेश याचा खून झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. रानतळे येथील वस्तीलगत हा पकार घडल्याने राजापूरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान राजेश चव्हाण हा तरूण सलून व्यवसायीक म्हणून परिचित होता. पूर्वी जकातनाका येथे त्याचे सलून होते. आठ दिवसांपूर्वीच त्याने राजापूर ग्रामीण रूग्णालयासमोरील गाळ्यांमध्ये नवीन सलून दुकान सुरू केले होते. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच अनेकांनी रानतळे येथे धाव घेतली.

Related Stories

हिमाचल प्रदेश : 10 फेब्रुवारीपासून सुरू होणार लसीकरणाचा दुसरा टप्पा

Tousif Mujawar

कोल्हापुरातील कागल शहर तिहेरी हत्याकांडाने हादरलं…

Archana Banage

वेळणेश्वरच्या समुद्रात नौका बुडाली

Patil_p

कोकणातील जनता उध्दव ठाकरेंसोबत,5 मार्चच्या सभेचे चित्र स्पष्ट झालंय- संजय राऊत

Archana Banage

‘सून सासू सून’ कार्यक्रमात राजापूरातील दोन सासू-सूनांचा सहभाग

Patil_p

भारनियमनाबाबत ऊर्जामंत्र्यांचे मोठं वक्तव्य, म्हणाले…

datta jadhav
error: Content is protected !!