Tarun Bharat

राजारामचे शेतकरी ज्ञानयागसाठी रवाना

प्रतिनिधी / कोल्हापूर

छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याकडून 50 सभासद शेतकऱ्यांचा समूह वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे या आशिया खंडातील सर्वात मोठ्या साखर उद्योग संशोधन संस्थेत ज्ञानयाग प्रशिक्षण शिबिरासाठी पाठविणेत आला. राजाराम कारखान्याच्यावतीने प्रतिवर्षी सभासद शेतकऱ्यांना या शिबिरात भाग घेणेसाठी पाठवले जाते. यावर्षी या ज्ञानयाग शिबिरासाठी मोठ्या संख्येने सभासद उत्सुक होते. त्यानुसार कारखान्यामार्फत नियोजन करून कार्यक्षेत्रातील एकूण 50 सभासदाना एकाच वेळी सदर ऊस विकास प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. या प्रसंगी प्रशिक्षणार्थी सभासद शेतकऱ्यांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला.

राजाराम कारखान्याचे बरेचशे सभासद हे अल्पभूधारक असल्यामुळे या जमिनीची उत्पादकता वाढवून कमीत कमी जमिनीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेता यावे तसेच कारखान्यास कार्यक्षेत्रातूनच मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध व्हावा यासाठी प्रति एकरी ऊसाचे उत्पादन वाढणे गरजेचे असून यासाठी आधुनिक ऊस शेती तंत्रज्ञानाची माहिती सभासदांना मिळावी व त्याचा उपयोग करून त्यांनी आपले एकरी उत्पादन वाढवावे, हाच यामागचा हेतू आहे. त्यानुसार हे सर्व सहभागी सभासद शेतकरी ऊस शेती विषयक अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करून घेतील आणि आपापल्या गावातील बांधापर्यंत ते इतर शेतकरी बांधवापर्यंत पोहचवतील असा आम्हास विश्वास असलेने कारखान्याने हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम हाती घेतला असून, असेच विविध उपक्रम राबवून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी राजाराम कारखाना सदैव प्रयत्नशील राहील असे मत कारखान्याचे संचालक अमल महाडिक यांनी व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.

तसेच कारखान्याचे अध्यक्ष दिलीप पाटील व जेष्ठ संचालक यांनी देखील यामध्ये सहभागी शेतकरी प्रत्यक्ष बांधावर काम करणारे असून ते बाकीच्या सभासदांच्यासाठी मार्गदर्शक ठरतील असा आशावाद व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. यावेळी शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या बाळासो पाटील व प्रल्हाद कोळी यांनी मनोगत व्यक्त करून कारखान्याच्या या सभासदाभिमुख उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आणि संचालक मंडळाला धन्यवाद दिले. या प्रसंगी कारखान्याचे संचालक प्रशांत तेलवेकर, आनंदा तोडकर, दिलीप उलपे, मानद तज्ञ सल्लागार पी. जी. मेढे, कार्यकारी संचालकप्रकाश चिटणीस यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, शेती विभागाचा स्टाफ तसेच शिबिरामध्ये सहभागी होणारे सभासद आणि शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढताच; आज ५७ रुग्णांची भर तर दोघांचा मृत्यू

Archana Banage

युवकाच्या खुनप्रकरणी कुख्यात गुंड बाबरच्या आवळल्या मुसक्या

Archana Banage

राज्यात भोंग्यावरून खूप काही सुरू आहे, पण विकासाचा भोंगा शाहूमिल मध्ये वाजला

Archana Banage

यंदा साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात अव्वल

Abhijeet Khandekar

पन्हाळा – बुधवारपेठ रस्त्यावर दरडीतील दगड कोसळल्याने भितीचे वातवरण

Archana Banage

सातारा : राज्यमंत्री सतेज पाटील यांनी घेतला कामकाजाचा आढावा

Archana Banage