इस्लामपूर/प्रतिनिधी
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव-सुरुल व कारंदवाडी युनिटचा गळीत हंगाम शुभारंभ राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते शुक्रवार दि.६ नोव्हेंबर २०२० रोजी होणार आहे,अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष पी.आर. पाटील यांनी दिली.
मंत्री पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता कारंदवाडी युनिट,सकाळी १०.३० वाटेगाव – सुरुल युनिट,तर दुपारी १२.३० वाजता साखराळे युनिटमध्ये गव्हाणीमध्ये ऊसाची मोळी टाकून गळीत हंगाम शुभारंभ केला जाणार आहे. दुपारी १ वाजता साखराळे युनिट कार्यस्थळावर मुख्य सभेचा कार्यक्रम होणार आहे. या सभेस ऊस उत्पादक सभासद यांनी उपस्थित रहावे,असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष पाटील यांनी केले आहे.यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील,कार्यकारी संचालक आर.डी.माहुली,सचिव प्रताप पाटील उपस्थित होते.

