Tarun Bharat

राजीव सातव यांचा उपचारास चांगला प्रतिसाद : माणिकराव ठाकरेंनी ट्वीट करत दिली माहिती

Advertisements


मुंबई\ ऑनलाईन टीम

काँग्रेसचे खासदार आणि राहुल गांधींचे विश्वासू सहकारी राजीव सातव यांना काही दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली आहे. पुणे येथील जहाँगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मध्यंतरी त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. राहुल गांधींनी देखील त्यांच्या तब्येतीविषयी डॉक्टरांजवळ चौकशी केली होती. काँग्रेसचे नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राजीव सातव उपचाराला चांगला प्रतिसाद देत असल्याची माहिती आज ट्वीटच्या माध्यमातून दिली आहे.

माणिकराव ठाकरे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, काँग्रेसचे खा.राजीव सातव हे पुणे येथील जहाँगीर हॅास्पीटल येथे उपचार घेत आहेत. आज त्यांच्या पत्नी सौ.प्रज्ञा यांच्याशी दुरध्वनीवर संपर्क करून श्री.सातव यांच्या तब्येतीची विचारपुस केली. त्यांच्या माहितीप्रमाणे श्री.सातव हे उपचारास चांगला प्रतिसाद देत आहेत व लवकरच ते बरे होतील.

राजीव सातव हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटचे गुजरात प्रभारी आहेत, तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक आहेत. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करुन राजीव सातव 2014 मधील लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते.राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने 2017 मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं. फेब्रुवारी 2010 ते डिसेंबर 2014 या काळात त्यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं. हिंगोलीच्या खासदारपदी असताना सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला. राजील सातव यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. राजीव सातव यांनी स्वतःहून 2019 मधील लोकसभा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र गेल्या वर्षी झालेल्या राज्यसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या कोट्यातून सातव यांची खासदारपदी वर्णी लागली.

Related Stories

आज राज्यात १८७ नवीन रुग्णा; एकूण रुग्णसंख्या १७६१

Abhijeet Shinde

युपी : आंतरराष्ट्रीय शूटर दादी चंद्रो तोमर यांना कोरोनाची लागण

Rohan_P

रत्नागिरी: लांजात कंटेनरला अपघात; हायवेवर 5 तास वाहतूक ठप्प

Abhijeet Shinde

आणखी तीन बळी, ५१ पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

चुकीच्या इंपिरीकल डेटामुळे असंतोष निर्माण होऊ शकतो : देवेद्र फडणवीस

Abhijeet Khandekar

महाराष्ट्र : कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.73 टक्क्यांवर!

Rohan_P
error: Content is protected !!