Tarun Bharat

राजू शेट्टींच्या जलसमाधी यात्रेची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

प्रतिनिधी / शिरोळ

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांची पंचांग परिक्रमा समाधी पदयात्रा प्रयाग चिखली येथून सुरु झाली. आज सकाळपासून नृसिंहवाडीच्या दिशेने ही पदयात्रा सुरु आहे. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील बस स्थानकावर पदयात्रा आल्यानंतर या पदयात्रेचे सभेत रूपांतर होण्याची शक्यता आहे. ही सभा संपल्यानंतर राजू शेट्टी जलसमाधी आंदोलन करणार आहेत. मात्र याआधीच या जलसमाधी यात्रेचे दखल राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी घेतली आहे. तर, उद्या सोमवारी दुपारी तीन वाजता वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली असल्याची खात्रीलायक वृत्त आहे.

तर, या यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. कृष्णा पंचगंगा नदी पात्र संगम घाटावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तसेच यांत्रिक बोटी विविधरेस्क्यू फॉर्स शेकडो जवान तैनात करण्यात आले आहेत. याचबरोबर श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे विविध पॉईंटवर 400 पोलीस तसेच पोलीस प्रशासनाकडून राज्य राखीव पोलीस दलाची 350 जवानांची कुमक मागवण्यात आली आहे.

Related Stories

मांगल्यदायी दीपावलीला आज वसूबारसने प्रारंभ

Archana Banage

मध्य प्रदेश : कोविड 19 विरुध्द लढण्यासाठी रिलीफ फंडामध्ये मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री करणार मदत

Tousif Mujawar

महाराष्ट्राच्या एकीला गालबोट लावल्यास, सहन करणार नाही : मुख्यमंत्री

prashant_c

मुरादाबाद मध्ये डॉक्टरांवर हल्ला, योगी सरकारकडून दोषींवर कारवाई चे आदेश

prashant_c

कोल्हापूर जिल्ह्यात 41 कोरोनामुक्त तर 30 नवे रूग्ण

Archana Banage

स्टार एअरच्यावतीने बेळगाव ते सुरत विमान सेवा सुरू

Archana Banage