प्रतिनिधी / शिरोळ
शिरोळ येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचाराकरता दखल करण्यात आले आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी त्यांनी स्वतः होम क्वारंटाईन केल्याचे जाहीर केले होते.
आज पहाटेपासून त्यांना श्वासोच्छ्वासाचा त्रास होऊ लागल्याने तातडीने पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तालुका पंचायत समितीचे उपसभापती सचिन शिंदे यांनी दिली आहे.

