Tarun Bharat

राजेश फळदेसाई यांची वाहनसेवा ठरली मोठा आधार

स्वतःचे वाहन नसलेल्यांना मदतीचा हात

प्रतिनिधी/ पणजी

कुंभारजुवे मतदारसंघातील समाजकार्यकर्ते, उद्योजक तथा नवी दिशा फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश फळदेसाई यांनी संपूर्ण कुंभारजुवे मतदारसंघातील लोकांसाठी कोरोना महामारीच्या संकटकाळात स्वखर्चाने मोफत उपलब्ध करुन दिलेल्या रुग्णवाहिका सेवा लोकांसाठी मोठा आधार ठरली आहे. सहा रुग्णवाहिका लोकांच्या सेवेसाठी चोविस तास कार्यरत आहेत.

गेल्या वर्षीपासून कोरोना काळात लोकांना विविध प्रकारे मदतीचा हात देण्याचे काम राजेश फळदेसाई यांनी केले आहे. अनेकांना त्यांनी अन्नधान्य वितरण व अन्य मदत करत असतानाच त्यांच्या लक्षात आले की अनेकजणांना वेळेवर वाहन उपलब्ध होत नसल्याने प्राणांना मुकावे लागले आहे. म्हणून त्यांनी आपल्यातर्फे अशा लोकांना मदत व्हावी, यासाठी त्यांनी स्वतःची सहा वाहने लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध केली आहेत. मतदारसंघाच्या विविध पंचायत क्षेत्रांमध्ये ही वाहने तैनात करण्यात आली असून संपर्क साधल्याबरोबर रुग्ण आहे तिथे जाऊन त्याला सेवा दिली जाते.

या वाहनांद्वारे लोकांना हॉस्पिटलमध्ये पोहोचविण्यात येते, हॉस्पिटलमधून घरी सोडले जाते, कोरोना चाचणी, लसीकरण करण्यासाठी नेणे अशी सेवा दिली जाते. या वाहनांमध्ये ऑक्सिजन, ऑक्सिमीटर व अन्य प्रथमोपचार सुविधा आहेत. या सहा वाहनांद्वारे मतदारसंघातील लोकांना सेवा देण्यासाठी फळदेसाई यांच्यासह 15 वाहन चालकांसह कार्यकर्त्यांची टीम चोविस तास कार्यरत असते. खोर्ली, दिवाडी, जुने गोवे, बेतकी येथील आरोग्य केंद्रे, बांबोळी गोमेकॉ तसेच खासगी इस्पितळामध्येही लोकांना या वाहनांतून पोहोचविले जाते.

दीड हजारहून अधिक कोविड किट वितरण

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी गरजूंना संपूर्ण कोविड किट दिले जाते, ज्यामध्ये ऑक्सिमीटर, थर्मामीटर, सॅनिटायझर, एन-95 मास्क, सर्जिकल मास्क मोफत दिले जातात. मतदारसंघातील दिवाडी बेटावरील सां मातियश, गोलती नावेली, ओल्ड गोवा, खोर्ली, करमळी, कुंभारजुवे, सांतइस्तेव्ह, आखाडा या परिसरातील सर्वांना ही मोफत सेवा दिली जात आहे. आतापर्यंत संपूर्ण मतदारसंघात 1500 हून अधिक कोविड किटचे वितरण फळदेसाई यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

फादर आल्प्रेड वाझ यांच्याकडून आशीर्वाद

ओल्ड गोवा येथील से कॅथेड्रल चर्चचे पेरिश प्रिस्ट फादर आल्प्रेड वाझ यांनी राजेश फळदेसाई यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा करुन त्यांचे अभिनंदन केले  आहे. अत्यंत महत्वाची असलेली वाहनसेवा लोकांना उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांनी आशीर्वादही दिले. या कार्याची दखल घेऊन फळदेसाई यांना अधिक मानवसेवा करण्याची शक्ती देव देईल, असेही फादर यावेळी म्हणाले.

राजेश फळदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की ही सेवा राबविताना खूप समाधान मिळत आहे. आपण समाजासाठी काहीतरी करु शकलो, याचा अभिमान वाटत आहे. आमच्या या सेवेमुळे अनेकांचे प्राण वाचले, यापेक्षा आणखी काय मोठे हवे असते. ज्यांना गरज आहे, त्यांनी कधीही कार्यकर्त्यांना संपर्क साधून या वाहनांचा उपयोग करुन घ्यावा. ज्यांना कुणाला ही  सेवा हवी असेल त्यांनी 9623979698 किंवा 8788955347 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““““`

Related Stories

गोव्यात आज, उद्या पावसाची शक्यता

Amit Kulkarni

राज्यात 30 मेपासून ‘मोदी पर्व’ साजरे करणार

Amit Kulkarni

आंतरराज्य अकादमी क्रिकेट स्पर्धेत एम्स सावंतवाडी, आनंद क्रिकेट अकादमीचे विजय

Amit Kulkarni

पणजीतील दुकाने खुली करण्याची मनपाची तयारी

Patil_p

भाऊसाहेब बांदोडकरांना राज्यभरातून आदरांजली

Amit Kulkarni

गोवा शिवसेनेकडून नऊ उमेदवारांची घोषणा

Abhijeet Khandekar