Tarun Bharat

राजे सरदारांवर मेहरबान…!

Advertisements

स्वीकृतची जबाबदारी बाळासाहेबांच्या खांद्यावर : सभापतीनिवडीमध्येही होणार सरदारांचा सन्मान?

विशाल कदम / सातारा

एक नेता एक आवाज…उदयन महाराज उदयन महाराज, अशा गगनभेदी घोषणा पालिकेच्या प्रवेशद्वारावर मंगळवारी सातारकरांनी ऐकल्या. फटाकेही फुटले. निमित्त होतं ते म्हणजे खासदार उदयनराजेंचे सच्चे सरदार बाळासाहेब ढेकणे यांच्यावर स्वीकृतची जबाबदारी दिल्याचे. बाळासाहेब ढेकणे यांच्या कार्यकर्त्यांनी पालिकेत काल जल्लोष केला. खासदार उदयनराजे हे सरदारांच्यावर मेहरबान होवू लागले आहेत. उपाध्यक्ष म्हणून मनोज शेंडे यांच्यावर तर आता स्वीकृत म्हणून बाळासाहेब ढेकणे यांच्यावर जबाबदारी दिली गेली आहे. सभापती निवडीमध्येही विश्वासू सरदारांची निवड करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

आगामी पालिकेची निवडणूक डोळय़ासमोर ठेवून खासदार उदयनराजे हे आपल्या सच्च्या, निष्ठावान सरदारांनाच संधी देत आहेत. जे मावळे लढाईच्यावेळी मैदानात असतात. खंबीरपणे मतदारांना आपल्याकडेच खेचून आणण्याचा प्रयत्न करतात. आपल्या राजांसाठीच तन, मन, धनाने काम करतात. अशाच सरदारांच्यासाठी खास उदयनराजे यांचे लक्ष असते. लोकसभेच्या दोन्ही निवडणूकीवेळी कोणते नगरसेवक काय करत होते यावर बारीक लक्ष खासदार उदयनराजेंचे होते. कोण रुसत होते कोण कोणाच्या प्रलोभनाला बळी पडत होते तर कोण झटत होते याचा सर्व काही डाटा खासदार उदयनराजेंच्या डोक्यात फिट आहे. त्याचाच प्रत्यय आता येवू लागला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी उपाध्यक्षपदी म्हणून मनोज शेंडे यांची निवड करण्यात आली. मनोज शेंडे यांनी त्या काळात अपार मेहनत घेतली होती. तसेच स्वीकृत नगरसेवक पदाची जबाबदारी दिलेल्या बाळासाहेब ढेकणे यांचे तर खासदार उदयनराजेंच्यासाठी काहीही करायला तयार असतात. त्यांच्यावर जबाबदारी सोपवली गेली आहे. त्यामुळे बाळासाहेब ढेकणे हे नगरसेवक नसतानाही करंजे, तामजाईनगर, शाहुपुरी भागासाठी झटत होते आता पद आल्यामुळे ते दुप्पट वेगाने कामाला लागणार हे निश्चित. तसेच दि.3 रोजी सभापतींची मुदत संपत आहे. त्यामुळे नव्याने कोणाला संधी मिळणार?, कोणाला डच्चू मिळणार याकडे नजरा आहेत. तर प्रामुख्याने खासदार उदयनराजे हे सातारा विकास आघाडीसाठी जे निष्ठेने काम करतात. त्या सरदारांवर सभापती निवडीमध्ये खासदार उदयनराजे हे पुन्हा मेहरबान होणार हे निश्चित.

Related Stories

मांढरदेवच्या काळूबाईची यात्रेची मुख्य पूजा साध्या पद्धतीने संपन्न

Abhijeet Shinde

Satara : मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागाकडील कामांचा आढावा

Abhijeet Khandekar

कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्तीचे द्विशतक

Patil_p

सातारा : मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

शहरी भागात होणार वॉर्डनिहाय लसीकरण

Patil_p

स्थानिक गुन्हे शाखेने मोगराळे घाटात 8 किलो गांजा पकडला

Patil_p
error: Content is protected !!