Tarun Bharat

राज्यपालांच्या गौप्यस्फोटाने मुख्यमंत्र्यांचा खोटारडेपणा उघड

शिवसेना गोवाप्रमुख जितेश कामत यांचा दावा

प्रतिनिधी /पणजी

यथा नाम तथा गुण ही म्हण माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी तंतोतंत खरी ठरविली असून त्यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळेच प्रमोद सावंत यांचा खोटारडेपणा आणि गलथान कारभार उघड झाला आहे. तसेच कोविड आणि सर्वच कारभारात सावंत सरकार भ्रष्टाचार करीत असल्याचेही सिद्ध झाले आहे, असा दावा शिवसेना गोवा राज्यप्रमुख जितेश कामत यांनी केला आहे.

पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी सरचिटणीस मिलिंद गावस, उपराज्यप्रमुख सुभाष केरकर, उत्तर जिल्हा प्रमुख सुशांत पावसकर, बार्देश तालुका प्रमुख विन्सेंट पेरेरा, हळदोणे मतदारसंघ प्रमुख रमेश मटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कोविड मुळे दगावलेल्या बहुसंख्य लोकांच्या मृत्यूला सावंत सरकार कारणीभूत आहे. भ्रष्टाचाराचे पुरावे म्हणून ज्यांकडे पाहता येईल अशा रस्त्यावरील खड्डय़ांमुळे अपघात होऊन बळी गेलेल्या लोकांच्या मृत्युंनाही हेच सरकारच जबाबदार आहे. एका प्रकारे हा सामुहिक खून आहे. त्यामुळे राज्यपाल पिल्ले यांनी हे सरकार बरखास्त करून प्रमोद सावंत यांच्या विरोधात गुन्हा नोंद करावा अशी जोरदार मागणी केली आहे. गोमंतकीयांच्या हितासाठी प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येऊन राज्यपालांना साकडे घालण्याचीही त्यांनी गरज व्यक्त केली असून लवकरच  राज्यपालांची भेट घेऊन सरकार बरखास्तीची मागणी करणार, असल्याचे सांगितले आहे.

सध्या युवकांना नोकऱयांची आमिषे दाखवून स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी सरकारने ’स्वयंपूर्ण युवा’ कार्यक्रम सुरु केला आहे. मात्र युवकांनी अशा  आमिषांना बळी पडून या श्रापित सरकारच्या पापात सहभागी होऊ नये. नोकरी मिळवणे हा हक्क आहे. परंतु नोकरीच्या बदल्यात मत घालतलेच पाहिजे, असे काही नाही. तसे झाल्यास या सरकारला साथ देणाऱयांनाही नोकरी सोबत मोफत श्रापांची भागिदारी मिळणार असल्याचे कामत यांनी म्हटले आहे.

नास्नोडा पंचसदस्याचा कार्यकर्त्यांसमवेत शिवसेनेत प्रवेश

दरम्यान, याच पत्रकार परिषदेदरम्यान, हळदोणे मतदारसंघातील नास्नोडा पंचायतीचे विद्यमान पंचसदस्य तथा माजी सरपंच गोविंद गोवेकर यांनी असंख्य कार्यकर्त्यांसमवेत शिवसेनेत प्रवेश केला. ते श्री रवळघाडी ग्रामस्थ पंचायतन समितीचे अध्यक्ष आहेत. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे हळदोणे मतदारसंघ अध्यक्ष, गोमंतक भंडारी समाजाचे हळदोणे मतदारसंघ उपाध्यक्ष आहेत.

त्यांच्या समवेत प्रवेश केलेल्यांमध्ये श्री रवळघाडी ग्रामस्थ पंचायतन समितीचे खजिनदार दिलीप मालदार, उपसचिव स्वप्नलि बिलवालकर, ऍटर्नी सुशांत मयेकर, उपऍटर्नी सुमीत नाईक, उप खजिनदार तनय नागवेकर, ॐ शिव रवळनाथ महिला घुमट आरती गटाच्या अध्यक्ष मेधा वायंगणकर, प्रतिमा गोवेकर, वंदना नाईक, ब्रुनो रोड्रिग्ज, चार्ली डिसुझा, आकाश कोरगावकर, सागर बिचोलकर, राजन तुयेकर, रोहिदास नाईक, चंद्रकांत नाईक, साहिल सरमळकर यांचा समावेश होता.

Related Stories

कोरोनाबाधित रुग्णांना खोडयेत ठेवण्यास विरोध

tarunbharat

पंधरा लाखाच्या ड्रग्जसह नायजेरियनास अटक

Omkar B

कारापूर कुडणेत काँग्रेसचा पाठींबा अपक्ष अजय नाईक यांना ?

Omkar B

फसवे अंदाजपत्रक मुख्यमंत्र्यांकडून सादर

Patil_p

मुरगाव विकास व नियोजन प्राधिकरणाने चिखली ग्रामस्थांचा आराखडा फेटाळला

Patil_p

गोवा डेअरीच्या बदलत्या नुकसानीच्या आकडय़ामुळे दूध उत्पादकांमध्ये संभ्रम

Amit Kulkarni