Tarun Bharat

राज्यपालांच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर खा. उदयनराजे यांची पहिली प्रतिक्रिया

”राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे”

ऑनलाईन टीम / तरुण भारत

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा एका कार्यक्रमात बोलताना तोल सुट्ल्याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले असुन या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रात अनेक स्तरातुन संतापजनक प्रतिक्रीया येत आहेत. तसेच खासदार उदयनराजे भोसले यांनी ही याबाबत ट्वीट करत भगतसिंह कोश्यारी यांच्या या वक्तव्यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यात उदयनराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु राष्ट्रमाता जिजाऊ होत्या, असं मत व्यक्त केलं. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी हे वक्तव्य करून शिवप्रेमींसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्याचं म्हटलं आहे.

उदयनराजे भोसले म्हणाले, “राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु होत्या. तरीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जाणीवपुर्वक रामदास हे महाराजांचे गुरू होते असे वक्तव्य करून शिवप्रेमींसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे.” असे ते यात म्हणाले आहेत.

तसेच यावरुन राष्ट्रवादीचे नेते रोहीत पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला असुन “खरा इतिहास माहीत करून न घेता आपला अजेंडा रेटण्यासाठी खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला जात असेल तर हे नक्कीच निषेधार्ह आहे. असं होत असताना गप्प बसणं हे त्याहून अधिक निषेधार्ह आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माफी मागावी. असे ही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Related Stories

गँगस्टर मुख्तार मलिकचा राजस्थानमध्ये मृत्यू

Patil_p

शाहीनबागमध्ये 9 पासून ‘बुलडोझर’ कारवाई

Patil_p

दिलासा! दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट

datta jadhav

निवडणुका जिंकण्यासाठी सज्ज व्हा!

Patil_p

धोम येथील वाळूमाफियांना दणका

Patil_p

योगी आदित्यनाथ यांना करावा लागला तरुणांच्या रोषाचा सामना

Archana Banage