Tarun Bharat

राज्यपालांना धक्काबुक्की; काँग्रेसचे 5 जण निलंबित

Advertisements

शिमला

 हिमाचल प्रदेशच्या राज्यपालांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. राज्यपाल बंडारू दत्तात्रय यांना कथितपणे धक्काबुक्की केल्याबद्दल राज्यातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसच्या अन्य चार आमदारांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा उर्वरित कालावधी समाप्त होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. अधिवेशनातील अभिभाषण संपल्यानंतर राज्यपाल परत जात असताना हा प्रकार झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी काँग्रेस आमदारांच्या कृतीचा निषेध केला असून असे प्रकार व्हायला नकोत असे म्हटले आहे.

विधानसभेचे सत्र संपल्यानंतर राज्यपाल आपल्या वाहनाकडे निघाले असताना धक्काबुक्कीची घटना घडल्याचे राज्याचे संसदीय कामकाजमंत्री सुरेश भारद्वाज यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते मुकेश अग्निहोत्री यांच्यासह काँग्रेसच्या पाच आमदारांना या प्रकरणात निलंबित करण्यात आले आहे. हर्षवर्धन चौहान, सुंदरसिंह ठाकूर, सतपाल रायजादा आणि विनोद कुमार ही अन्य आमदारांची नावे आहेत.

Related Stories

कपील सिब्बल यांच्या घरी विरोधकांची काँग्रेसच्या नेतृत्त्वावर चर्चा; शरद पवारही होते उपस्थित

Abhijeet Shinde

आग्य्राचे युवक आत्मनिर्भरतेचे पायिक

Patil_p

पंतप्रधान मोदींनी ‘या’ काँग्रेस मुख्यमंत्र्यांचं केलं कौतुक

Abhijeet Shinde

भारत जोडो’ला देणगी न दिल्याने तोडफोड

Patil_p

खोटी माहिती पसरवण्यापेक्षा जागे व्हा आणि लोकांचे जीव वाचवा; प्रियांका गांधींची टूलकिटवरून भाजपवर टीका

Abhijeet Shinde

“मोदींच्या काळात आतापर्यंत ५ लाख ३५ हजार कोटी रुपयांची बँक फसवणूक”

Abhijeet Shinde
error: Content is protected !!