Tarun Bharat

राज्यपालांना धबधबा सुंदर दिसण्यासाठी अधिकाऱ्याने सोडले धरणातून पाणी

Advertisements

राज्यपालांना व्हीआयपी वागणूकीसाठी अधिकाऱ्यांनी हा प्रताप केला आहे.


ऑनलाईन टीम / कर्नाटक

राज्याचे प्रशासन सांभाळताना प्रशासनात अधिकाऱ्यांची भुमिका ही महत्त्वाची ठरत असते. मात्र काही वेळा वरीष्टांसाठी अधिकारी वर्ग काहीही प्रताप करु शकतात याचा प्रत्यय नुकताच आला असुन राज्यपालांना व्हीआयपी वागणूक देण्यासाठी अधिकाऱ्यांनी कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (KPCL) ने लिंगनमक्की धरणातून सुमारे ५०० क्युसेक पाणी सोडले. याचा उद्देश कोणते ही समाजहीत नसुन केवळ अन् केवळ दौऱ्यावर असणारे कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांना नयनरम्य जोग धबधबा पाहता यावा यासाठी हा कारणामा अधिकाऱ्यांनी परस्पर केला आहे.

राज्यपालांना व्हीआयपी वागणूक देता यावी यासाठी अधिकाऱ्यांनी कोणता ही परवाना न घेता मनमानी करत नदीकाठच्या लोकांना कोणतीही पूर्व सुचना न देता राज्यपाल येण्यापूर्वी शरावती नदीमध्ये पाणी सोडले. मात्र सोडलेले पाणई धबधब्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच राज्यपाल काही मनिटातच तेथून निघून गेले. यामुळे अधिकाऱ्यांनी केलेली ही धडपड तर व्यर्थ गेलीच आहे. मात्र नदी काठच्या नागरिकांचे जीव तर धोक्यात घातले आणि वर आता चौकशीचा ससेमिरा ही मागे लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

Related Stories

लालकृष्ण अडवाणी यांचा 94 वा वाढदिवस साजरा

Patil_p

बंगालींविषय वक्तव्यावर परेश रावलांचा माफीनामा

Patil_p

सुशांत आत्महत्या : बिहार सरकारकडून CBI चौकशीची शिफारस

Tousif Mujawar

झोपडपट्टीमध्ये शिरला ट्रक, 8 जणांचा मृत्यू

Patil_p

जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांचा जामीन नामंजूर

Anuja Kudatarkar

बसवराज बोम्माई यांनी शपथविधीपूर्वी येडियुराप्पांची घेतली भेट

Archana Banage
error: Content is protected !!