Tarun Bharat

राज्यपालांनी सर्वांना समान न्याय द्यायला हवा- मंत्री उदय सामंत

उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत; मी राज्यपालांचा लाडका मंत्री

प्रतिनिधी / सोलापूर

राज्यपाल आणि महाविकास आघाडीत कोणताही वाद नाही. प्रत्येकानेच नियमांमध्ये वागले पाहिजे. राज्यपाल हे राजकारणात माझ्यापेक्षाही अनुभवी आहेत. ते समान न्यायाने वागतील. राज्यपाल नियुक्त आमदार पदासाठी महाविकास आघाडीने 12 जणांची यादी पाठवली आहे. ती यादी लवकर मंजूर करतील अशी आमची अपेक्षा आहे, असे राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विमान प्रवास नाकारण्यात आला. राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये नवा संघर्ष पाहायला मिळतोय या प्रश्नावर उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, हा संघर्ष नाही. नियमांचे पालन करण्याचा हा भाग आहे. त्यावर मी अधिक बोलणार नाही.

उच्च शिक्षणमंत्री म्हणून राज्यपालांशी माझा कायम संपर्क असतो. मी त्यांचा लाडका मंत्री आहे. मला कोणतीही अडचण येत नाही. राजकीय ज्या घटना होत आहेत, त्या वेगळ्या आहेत. कुलपती म्हणून मला त्यांच्याकडे जावे लागते. त्यांच्यासोबत कामकाज करावे लागते, असेही उच्चशिक्षण मंत्री सामंत यांनी सांगितले.

उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने होणाऱया अध्यासन केंद्रामध्ये काय असावे हे विद्यापीठाने ठरवायचे आहे.
कोरोनाचे नियम पाळून सर्वांनी शिवजयंतीचा उत्सव साजरा करायला हवा.
विद्यापीठातील यंत्रणा सक्षम करण्यासाठी शासनाकडून निधी दिला जाईल.

गुणवाढ प्रकरणी पोलीस तपास चालू

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातील गुणवाढ प्रकरणी पोलीस तपास चालू आहे. तपासात जे समोर येईल, त्याप्रमाणे कारवाई होईल. ज्यांनी गुणवाढ केली आहे त्यांची चौकशी होवून शिक्षाही होईल. त्यांच्यामुळे संपूर्ण विद्यापीठाच्या कामकाजावर परिणाम होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यायला हवी. – उदय सामंत, उच्चशिक्षण मंत्री

Related Stories

सोलापुरात मंगळवारी १३ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची भर

Archana Banage

वराडे येथे वन्यजीव उपचार केंद्र मंजूर

Patil_p

राज ठाकरेंचे मराठी माणसांना पत्र; म्हणाले…

Tousif Mujawar

शाहूवाडी पोलिसांना जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाचे वावडे

Archana Banage

माजी मंत्री माणिकराव गावित यांचं निधन

datta jadhav

जिह्यातील 450 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक जाहीर

Patil_p