Tarun Bharat

राज्यपाल कोशारी व भाजपवर मंत्री यशोमती ठाकूर यांचा निशाणा

जत, प्रतिनिधी

राज्यात काँग्रेस,शिवसेना,राष्ट्रवादी यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्याचे काम सुरू केले आहे, अनेक चांगले निर्णय सरकार घेत आहे ,परंतु अनेक कामांना राज्यपाल विरोध करतात ते कुठल्या संविधानात बसते असा सवाल करत असा विक्षिप्त गव्हर्नर पाहिला नव्हता असा जोरदार घणाघात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला तर भाजप हा धोका देणारा पक्ष असल्याचा आरोपही त्यांनी केला, 

मंत्री यशोमती ठाकूर या गुरुवारी जत तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या , येथील आमदार विक्रम सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी थेट राज्यपाल भगतसिंग कोशारी त्यांच्यावर घणाघाती टीका केली सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यात कृषी महाविद्यालय सुरू करावी अशी मागणी आहे याबद्दल मी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा केली त्यांनी मला सांगितले की एक विक्षिप्त गव्हर्नर तेथे बसला आहे, अनेक कामाला राज्यपाल अडचण ठरत आहेत, ही वास्तविकता आहे. 

राज्याच्या मुख्यमंत्र्यांना संविधानावर प्रश्न निर्माण करणारे हे गव्हर्नर आहेत, खरंतर मग तुम्ही आम्ही कुठल्या संविधानाने जोडला आहोत, असा सवाल त्यांनी केला. यावेळी त्यांनी जतच्या वंचित गावांना कर्नाटकातून पाणी मिळू शकते या विषयाचा धागा पकडत त्यांनी भाजपवर निशाणा साधला , जतच्या पाण्यासाठी आम्ही सगळी ताकद पणाला लावू, विकासाच्या कामात आमचे कधीच मतभेद नसतात पण भाजप धोका देणारा पक्ष आहे, हे महाराष्ट्राने पाहिले आहे , दादा भूसेना त्याबद्दल अधिक माहिती आहे ,


परंतु जतकरांनी काळजी करू नये , कुठले काम कधी कुठे रेटायचे , कधी कोणाची कशी गच्ची पकडायची हे आम्हाला चांगले कळते, शिवाय कर्नाटकात आमचे आमदार व माजी मंत्री एम बी पाटील आहेत त्यांची साथ आपणास आहे, शिवाय मी स्वतः कर्नाटक च्या निवडणुकीत संबंध कर्नाटक फिरले आहे, जतच्या पाण्यासाठी जे काय करावे लागेल ती करण्याची भूमिका आम्ही घेऊ असेही त्यांनी स्पष्ट केले,

Related Stories

यंदाचे पहिले ‘असनी’ वादळ बांगलादेश-म्यानमारला धडकणार

Omkar B

सांगली : शाळेतील विद्यार्थ्यांनी केला अपहरणचा बनाव

Abhijeet Khandekar

सोलापूर शहरात 24 कोरोना पॉझिटिव्ह, एका रुग्णाचा मृत्यू

Archana Banage

हालसिद्धनाथ कारखाना दहा वर्षात कर्जमुक्त करणार

Omkar B

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कर्मचाऱयांना समान मानधन द्या

Patil_p

जैन धर्माचे संदेश आत्मसात करणे गरजेचे – आमदार लक्ष्मी हेब्बाळकर

Rohit Salunke