Tarun Bharat

राज्यभर पाऊस पुन्हा सक्रिय होणार; हवामान विभागाचे संकेत

पुणे/प्रतिनिधी

१६ ऑगस्टपासून राज्यात बहुतांश भागात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत हवामान विभागाकडून देण्यात आले आहेत. कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात सध्या हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. मात्र, बंगालच्या उपसागरामध्ये सध्या कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने त्याचा परिणाम राज्यावरही होणार आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविला जात आहे.

दरम्यान, हवामान विभागाने राज्याच्या बहुतांश भागात १६ ऑगस्टपासून पाऊस पुन्हा सक्रिय होण्याचे संकेतदिले आहेत. विदर्भात काही ठिकाणी मुसळधार, तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही भागांत विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह पावस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Related Stories

जिल्हय़ात चोरट्यांचा धुमाकूळ; कळंबा परिसरात 4 बंगले फोडले

Abhijeet Khandekar

‘मॅग्नेट’ सारखे प्रकल्प उभारून शेतकऱ्यांना चांगल्या व दर्जेदार सुविधा देणार : अजित पवार

Tousif Mujawar

चंदीगड विद्यापीठानंतर IIT मुंबईत धक्कादायक प्रकार; महिला वसतिगृहाच्या बाथरूममध्ये पाहताना एकाला अटक

Archana Banage

मान्सूनचे केरळात आगमन, लवकरच महाराष्ट्रात

datta jadhav

राजस्थानमध्ये कोरोना रुग्णांची एकूण संख्या 18,785 वर

Tousif Mujawar

अर्णब गोस्वामी यांना जामीन मंजूर, तात्काळ सुटका करण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश

Archana Banage