Tarun Bharat

”राज्यशासनाकडे कारखाने वाचवण्यास पैसे आहेत, मग पूरग्रस्तांसाठी का नाहीत ?”

ऑनलाईन टीम / मुंबई

गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात आलेल्या आपत्तीवरुन महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष यांच्यात पूरग्रस्तांसाठीच्या मदतीवरुन आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी याच आपत्ती व्यवस्थापनावरुन महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे.

पडळकर यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना बंद पडलेले व मोडकळीला आलेले साखर कारखाने सूरु करण्यासाठी 3800 कोटी रुपये खर्च करताना शासन कमी पडत नाही. मात्र पुराने उद्धवस्थ झालेला कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही महत्त्वाचे जिल्हे यासाठी मात्र राज्य शासन तिजोरी उघडत नाही. जाणीवपूर्वक ते दुर्लक्ष करत आहेत.

या उलट 2019 मध्ये महापूर आल्यावर फडणवीस सरकारने मात्र तातडीने मदत केली होती. कोणतेही पंचनामे न करता ती लोकांच्या नावे वर्ग केली होती. या शासनाला ही मी अशी विनंती करतो की, विनाविलंब कोणते ही निकष न लावता सर्व पूरबाधितांना शासनाने मदत करावी. पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून हे ‘सरकार खुर्ची बचाव’कार्यात व्यस्त आहे. पूरग्रस्त शेतकरी, नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना कुठल्याही निकषात न अडकवता. तातडीनं प्रत्येकी १ लाखाची मदत करा आणि व्यापाऱ्यांना पुढील दोन वर्षासाठी घरपट्टी, पाणीपट्टी, वीजबील माफ करा. असे ही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

Related Stories

उद्योगांचा कोविडविषयक टास्क फोर्स

Archana Banage

सांगली : कोरोना कक्षातील पाच कर्मचारी पॉझिटिव्ह

Archana Banage

चक्क एसटी आगारातच कचऱयाचा ढिग

Patil_p

राजधानीसह जिह्यात दिवाळीला उत्साहात झाला प्रारंभ

Patil_p

दुबार संसर्गाचा धोका बळावला

Archana Banage

सचिन वाझे मुख्यमंत्री ठाकरे यांना ‘फसवत’ होता, अँटिलिया प्रकरणात दिली खोटी माहिती

Archana Banage