Tarun Bharat

राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी घेतली फडणवीसांची भेट

Advertisements

मुंबई/प्रतिनिधी

राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या राज्यसभा सदस्यपदाच्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यासाठी आज रजनी पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, भाजपाने या निवडणुकीसाठी उमेदवार उभा करणार असल्याचं म्हंटलं आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेत राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली.

भाजपाने राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार उभा करणार असल्याचं म्हंटलंबाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्या विनंतीसंदर्भात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि कोअर कमिटीशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. दरम्यान, रजनी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्ष भाजपाला महाराष्ट्राच्या परंपरेचा दाखला देत म्हटलं होतं की, “आत्तापर्यंतची महाराष्ट्राची परंपरा अशी आहे की जेव्हा निधनासारखी दुर्दैवा घटना घडते, तेव्हा आपण निवडणुकीत एकमेकांना सहकार्य करून बिनविरोध निवडणूक करतो. पण मला खात्री आहे की विरोधी पक्ष म्हणून त्यांची काही भूमिका असली, तरी ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील आणि निवडणूक बिनविरोध करतील. यासाठी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत”.

Related Stories

कोडोलीत स्वाभिमानीचा रास्ता रोको; परिसरातील गावे सहभागी

Sumit Tambekar

खोजनवाडीत घरफोडी; साडेपाच लाखाचा मुद्देमाल लंपास

Abhijeet Shinde

कोविड केंद्रात महिला सुरक्षेसाठी एसओपी करा

Rohan_P

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची बाधा

Rohan_P

महाराष्ट्र आणि लडाखमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Rohan_P

सातवेतील तरुणावर परप्रांतीयांचा हल्ला; पोलीसापुढे आव्हान

Sumit Tambekar
error: Content is protected !!