Tarun Bharat

राज्यसभेतील नवनिर्वाचित 27 सदस्यांचे शपथग्रहण

सितारामन, गोयल, बोंडे, महाडिक यांचा समावेश

@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था

केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन आणि पियुष गोयल यांच्यासह राज्यसभेवर निवडून आलेल्या 27 सदस्यांनी शुक्रवारी वरि÷ सभागृहाच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. महाराष्ट्रातून राज्यसभेत निवडून गेलेल्या 6 खासदारांपैकी तिघांनी शपथग्रहण केले असून त्यात भाजपचे अनिल बोंडे, पियुष गोयल आणि धनंजय महाडिक यांचा समावेश होता. यापैकी बोंडे आणि महाडिक यांनी मराठीतून तर गोयल यांनी हिंदीत शपथ घेतली. नव्याने निवडून आलेल्या एकूण 57 सदस्यांपैकी 14 सदस्य पुन्हा राज्यसभेत परतले आहेत.

खासदार म्हणून काम सुरू करण्यापूर्वी नवनिर्वाचित सदस्यांनी राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत राज्यसभेच्या सभागृहात राज्यघटनेशी नि÷sची शपथ घेतली. शपथ घेणारे 27 सदस्य हे 10 राज्यांतील असून त्यांनी नऊ भाषांमध्ये शपथ घेतली. बारा सदस्यांनी हिंदी आणि चार सदस्यांनी इंग्रजीत तर प्रत्येकी दोन सदस्यांनी संस्कृत, कन्नड, मराठी आणि ओडिया भाषेत शपथ घेतली. तर प्रत्येकी एका सदस्याने पंजाबी, तमिळ आणि तेलगू भाषेत शपथ घेतली.

शपथविधी समारंभानंतर काही नेते आणि सभागृहातील सदस्यांशी साधलेल्या संवादादरम्यान ज्यांनी शपथ घेतली नाही ते निवडून आलेले सदस्य देखील 18 जुलै रोजी होणाऱया राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाग घेऊ शकतात, असे उपसभापती व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केले.

शपथ घेणाऱयांमध्ये काँग्रेसचे जयराम रमेश, विवेक तंखा आणि मुकुल वासनिक, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सुरेंद्र सिंग नागर, के. लक्ष्मण, कल्पना सैनी आणि लक्ष्मीकांत वाजपेयी यांचा समावेश होता. याशिवाय राष्ट्रीय लोक दलाचे जयंत चौधरी, बिजू जनता दलाच्या सुलताना देव आणि अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके) के. आर. धर्मर यांनीही वरि÷ सभागृहाच्या सदस्यत्वाची शपथ घेतली.

Related Stories

जियो-बीपी महिंद्राकरीता उभारणार चार्जिंग केंद्रे

Patil_p

दिल्ली मद्य घोटाळय़ात खासदारपुत्राला अटक

Patil_p

उत्तराखंडात मागील 24 तासात 473 नवे कोरोना रुग्ण; 09 मृत्यू

Tousif Mujawar

नवी दिल्ली : मिग-29 विमान दुर्घटनेतील बेपत्ता पायलटचा मृतदेह सापडला

datta jadhav

तिसऱया लाटेत ‘98 दिवसांचा संकटकाळ’

Patil_p

दिल्लीत 2,706 नवे कोरोना रुग्ण; 69 मृत्यू

Tousif Mujawar