Tarun Bharat

राज्यसेवा पूर्व परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्याने विद्यार्थी रस्त्यावर

पुणे/प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुन्हा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचे करण देत पुढे ढकलली आहे. कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान १४ मार्च रोजी होणारी एमपीएससी ची पूर्व परीक्षा अवघे ३ दिवस बाकी असताना पुढे ढकलण्यात आल्यामुळे आता परीक्षार्थी उमेदवारांमध्ये मोठा रोष पाहायला मिळत आहे. एमपीएससीच्या या निर्णयाचा विरोधात पुण्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. नवी पेठेमध्ये मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांनी रास्तारोको सुरू केला आहे. तसेच भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचं पडळकर यांनीही विद्यार्थ्यांच्या बरोबर रास्तारोख करत निषेध नोंदविला.

परीक्षा पुढे ढकलल्याचे विद्यार्थ्यांना समजताच सुरुवातीला अलका चौकातून सिंहगड रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूला विद्यार्थ्यांनी रास्तारोको केला होता. पण पोलिसांनी एका बाजूची वाहतूक सुरू केली असली, तरी दुसऱ्या बाजूला विद्यार्थी मोठ्या संख्येने गोळा होऊन एमपीएससीच्या या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करताना दिसत आहेत.

राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलल्याचे समजताच पुण्यातील एमपीएससीचा अभ्यास करणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला. पुण्यातील विद्यार्थी रस्त्यावर उतरल्यानन्तर हळूहळू राज्यभरात बहुतांश ठिकाणी एमपीएससीचा अभ्यास करणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरत आहेत. त्यामुळे सरकारला योग्य निर्णय घेणे अवश्यक आहे. अन्यथा विद्यार्थ्यांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.

राज्यात इतर सर्व परीक्षा होत असताना फक्त एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाणं हे चूक आहे. सरकारने तातडीने हा निर्णय बदलायला हवा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. परीक्षेच्या ३ दिवस आधी परीक्षा पुढे ढकलल्या जाऊ शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिली आहे. यावेळी तांबे यांनी याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बोलणार असल्याचे स्पष्ट केले.

Related Stories

केंद्राकडून हिमाचल प्रदेशाला 500 व्हेंटिलेटर

Tousif Mujawar

यासिन मलिकला फाशी की जन्मठेप?, एनआयए कोर्ट काही वेळात देणार निर्णय

Archana Banage

‘ही तर बुरसटलेली तालिबानी मानसिकता’; फडणवीसांची शिवसेनेवर जहरी टीका

Archana Banage

परिवहन कर्मचाऱयांच्या प्रशिक्षण कालावधीत कपात

Amit Kulkarni

संयुक्‍तराष्ट्रांच्या हेलिकॉप्टरवर जिहादींचा हल्ला, दोघांचा मृत्यू

datta jadhav

श्रीनिवास प्रसाद यांची निवृत्तीची घोषणा

Amit Kulkarni