Tarun Bharat

राज्यस्तरीय खोखो स्पर्धेसाठी जिल्हा खोखो संघाची निवड

क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव

बेळगाव अमॅच्युअर खोखो संघटनेच्या वतीने हुबळी-धारवाड येथे होणाऱया राज्यस्तरीय खोखो स्पर्धेसाठी बेळगाव जिल्हा पुरूष संघाची निवड करून नूतन ग्रा. पं. अध्यक्ष सतीश पाटील यांचा गौरव करण्यात आला.

बेळगाव जिल्हा अमॅच्युअर खोखो संघटनेतर्फे नवहिंद सोसायटीच्या सभागृहात बैठक पार पडली. या बैठकीत केंद्रीय रेल्वे मंत्री खासदार सुरेश अंगडी व सहशिक्षक एन. बी.गोजेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बैठकीत 5 ते 6 मार्च रोजी हुबळी-धारवाड येथे होणाऱया खुल्या राज्यस्तरीय खोखो स्पर्धेबद्दल चर्चा करून पुरूष खोखो संघाची निवड करण्यात आली. यावेळी येळ्ळूर ग्रा.पं. अध्यक्ष सतीश पाटील यांचा गौरव करण्यात आला. अमॅच्युअर खोखो संघटनेचे ऍड. एम. एम. पाटील, एन. आर. पाटील, वाय. सी. गोरल, नितिन नाईक, व्हीटी कुकडोळकर, ऍड. अमर पाटील उपस्थित होते.

Related Stories

चक्रीवादळामुळे कारवार जिल्हय़ात जनजीवन विस्कळीत

Amit Kulkarni

झाडे कोसळून जीव जाण्याच्या घटनांत वाढ

Amit Kulkarni

वेस्टर्न रेल्वे, जम्मू-काश्मीर पोलीस, सीआरपीएफ दिल्ली विजयी

Amit Kulkarni

कोरे, जेड गल्लीत दूषित पाण्याचा पुरवठा

Amit Kulkarni

पोलीस उपअधीक्षक रवी नाईक यांना मुख्यमंत्री पदक

Patil_p

उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस चरलिंगमठांचा सत्कार

Amit Kulkarni