Tarun Bharat

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत वैभवी दळवीला यश

Advertisements

सब ज्युनियर गटात सुवर्ण, ज्युनियर गटात रौप्य

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

दावणगेरी येथे कर्नाटक राज्यस्तरीय सबज्युनियर, ज्युनियर वरि÷ वेटलिफ्टिंग स्पर्धेत 59 वजनी गटात अलतग्याची कन्या वैभवी दळवी हिने सब ज्युनियर गटात सुवर्णपदक तर ज्युनियर गटामध्ये रौप्य पदक पटकाविले.

दावणगेरी येथे झालेल्या या स्पर्धेत संपूर्ण राज्यातून जवळपास 50 हून अधिक वेटलिफ्टरनी भाग घेतला होता. सबज्युनियर गटात 59 किलो वजनी गटात तिने सुवर्णपदक पटकाविले तर ज्युनियर गटात रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तिने एकूण 93 किलो वजन उचलून सबज्युनियर गटात सुवर्णपदकाची कमाई केली.

 वैभवी ही पदवीपूर्व महाविद्यालयात 12 वीत शिकत असून, तिने शशिकांत व संजय रेडेकर यांच्याकडून वेटलिफ्टिंगचे धडे गिरविले. सध्या युवजन क्रिडा खात्याचे वेटलिफ्टिंग प्रशिक्षक सदानंद मालशेट्टी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे. ती नेहरू नगर येथील युवजन क्रीडा खाते येथे सराव करीत आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Stories

अपघाती मृत्यू झालेल्या त्या मनोरुग्ण महिलेवर कदंबा फाउंडेशन च्या पुढाकाराने अंत्यसंस्कार

Patil_p

पत्रकार-कुटुंबीयांसाठी विविध योजना राबविणार

Amit Kulkarni

लिलाव प्रक्रियेनंतरही स्थगिती

Amit Kulkarni

यरमाळ-वडगाव रस्त्यावर बेवारस ट्रक

Patil_p

मटण मार्केटमधील 5 गाळय़ांना मनपाचे टाळे

Omkar B

यमनापूर येथील होलसेल दूध व्यापाऱयाला 17 हजाराला लुटले

Patil_p
error: Content is protected !!