Tarun Bharat

राज्यांना स्वतंत्र क्रीडा मंत्रालय आवश्यक – श्रीनिवास रेड्डी

कबड्डी ग्रासरुटपासूनचे प्रशिक्षण दिले जावे

प्रतिनिधी / कोल्हापूर

मातीतून अत्याधुनिक मॅटवर गेलेला कबड्डीचा खेळ व त्यातील कौशल्यात झपाट्याने बदल होत आहेत. हे बदल स्वीकारून भारतीय संघाने जगात अव्वल दर्जा मिळवला आहे. कबड्डीमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी पुढाकार घ्यावा. तसेच हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रासह देशातील सर्वच राज्यांमध्ये स्वतंत्र क्रीडा मंत्रालय अस्तित्वात आणून कबड्डीबरोबरच अन्य खेळाचा प्रसार केल्यास तरुणाई मोठ्या संख्येने खेळाकडे आकृष्ट होईल, असे भारतीय कबड्डी संघाचे माजी प्रशिक्षक श्रीनिवास रेड्डी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

गेले वर्षभर अथक परिश्रम घेऊन भारतीय कबड्डी संघाचे माजी प्रशिक्षक रमेश भेंडिगिरी व जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव संभाजी पाटील यांनी गोकुळ शिरगाव परिसरात इनडोअर स्वरुपाची कबड्डी रावज् ऍपॅडमी स्थापन केली. 30 गुंठे जागेत उभारलेल्या ऍपॅडमीच्या इमारतीला रेड्डी यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते म्हणाले, भारतात कबड्डीचा चांगला प्रसार झाला आहे. त्यामुळे भारतीय कबड्डी संघ जगात बलाढ्य समजल्या जाणाऱ्या इराण, दक्षिण कोरिया, जपान, ऑस्ट्रेलिया या देशातील संघांच्या तुलनेत कितीतरी पटीने बलाढ्य आहे. असे ही ते म्हणाले.

Related Stories

छ. शाहू महाराजांच्या नावे कोल्हापूरात क्रीडा विद्यापीठाची स्थापना करा – खासदार माने

Archana Banage

आशा वर्कर्सचा महापालिकेवर लाटणे मोर्चा

Abhijeet Khandekar

Kolhapur; मॉरीशसमध्ये होणार डॉ. शरद गायकवाड यांचा सन्मान

Abhijeet Khandekar

पीक नुकसान भरपाई; स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शासन निर्णयाची होळी

Archana Banage

Kolhapur Breaking; सख्या बहिणीचा व तिच्या नवऱ्याच्या खून प्रकरणी सख्या भावांना आजन्म कारावास

Abhijeet Khandekar

पालकमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातच चंद्रकांत पाटलांचे ठाण

Archana Banage