नागपूर \ ऑनलाईन टीम
राज्यातील १८ जिल्ह्यांतील सर्व निर्बंध हटविण्यात आल्याची घोषणा काल , गुरूवारी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली होती. यानंतर काही वेळेतच असा कोणताही निर्णयच झाला नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले. यामुळे मात्र नागरिकांच्यात गोंधळ निर्माण झाला होता. अनलॉकच्या नव्या गाईडलाईन संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवला आहे. मुख्यमंत्री त्यावर विचार करतील आणि दुपारपर्यंत अधिकसूचना निघेल, अशी प्रतिक्रिया आजमदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, अनलॉकच्या नव्या गाईडलाईन संदर्भात अंतिम प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे. त्यांची परवानगी मिळाल्यानंतर अधिसूचना निघेल. जिल्ह्यातील परिस्थितीनुसार ते लागू होईल, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.
विजय वडेट्टीवार यांनी यावेळी देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेला देखील उत्तर दिले. म्हणाले, विरोधक म्हणून त्यांची भूमिका योग्य असून त्यांना ती मांडावीच लागते. पण यामध्ये श्रेयवादाचा कोणताही विषय नाही. सरकार म्हणून जे काही करावं लागतं ते आम्ही करत असल्याचे विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले.
विजय वडेट्टीवार यांच्या स्पष्टीकरनानंतर अनलॉक संदर्भात निर्माण झालेला गोंधळ आज दुपारपर्यंत दूर होईल, अशी आशा आहे.


previous post