Tarun Bharat

राज्यातील कोरोनामुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्याबाबत शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचना जारी


मुंबई \ ऑनलाईन टीम

राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत राज्य शासनाकडून कोरोनामुक्त क्षेत्रातील ८ वी ते १२ वीचे वर्ग येत्या १५ जुलै २०२१पासून सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. विद्यार्थी शाळेत येण्यासाठी ‘चला मुलांनो शाळेत चला’ अशी मोहिम राबवण्याची सूचना करण्यात आली आहे. गावस्तरावर समिती स्थापना करणे आवश्यक असून, शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची लेखी परवानगी देखील आवश्यक असणार आहे.

ग्रामपंचायत स्तरावर सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली खालील प्रमाणे समिती गठीत करावी. समितीचे अध्यक्ष हे सरपंच असतील, सदस्यांमध्ये तलाठी व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, मुख्यध्यापक व केंद्रप्रमुख यांचा समावेश, निमंत्रित सदस्यांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचा वैद्यकीय अधिकारी, सदस्य सचिव म्हणून ग्रामसेवक असतील.

ग्रामपंचायत स्तरावर संरपंच यांच्या अध्यक्षतेखाली तलाठी, शाळा व्यवस्थापन समिती, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामसेवक,मुख्यध्यापक आणि केंद्रप्रमुख यांची समिती गठीत करून शाळा सुरु होण्यासाठी चर्चा करावी.

शाळा सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे-

शाळा सुरु होण्यापूर्वी ‘चला मुलांनो शाळेत चला’ अशी मोहिम शाळेने राबवावी.

शाळेत कोणी कोरोनाग्रस्त आढळल्यास शाळा तात्काळ बंद करावी.

टप्प्या टप्प्याने शाळा सुरु करावी.

शिक्षकांच्या राहण्याची सोय गावातच करावी. शिक्षकांनी सार्वजनिक वाहतूकीचा पर्याय टाळावा.

शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची RTPCR चाचणी करणे अनिवार्य आहे.

शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन द्यावी.

सतत हात साबणाने हात धुणे, मास्कचा वापर,सोशल डिस्टन्सिंग पाळणे यासारख्या नियमांचे पालन करणे विद्यार्थी तसेच शिक्षकांना अनिवार्य आहे.

वर्गात एका बाकावर एक विद्यार्थी बसवावा तसेच दोन बाकांमध्ये ६ फूटांचे अंतर ठेवावे. एका वर्गात जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थी असावेत.

शाळेत कोरोना सेंटर असल्यास ते एक तिथून दुसऱ्या ठिकाणी हलवावे आणि शाळेचे त्वरित निर्जुंकिकरण करावे.

शाळेत विलगीवकरण केंद्र असेल्यास तिथे शाळा भरवणे शक्य नसल्याचे खुल्या परिसरात शाळा भरवावी.

Related Stories

गोवा विधानसभा : काँग्रेसच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

Abhijeet Khandekar

लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला 2 कोटींचा टप्पा; मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन

Archana Banage

मुंबई : एकाच आय टी कंपनीतील 19 जणांना कोरोनाची बाधा

prashant_c

कडेगाव शहरात सापडला पहिला कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

मुंबईतील लसीकरण केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी आदित्य ठाकरेंची महापालिका आयुक्तांशी चर्चा

Archana Banage

पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा

Archana Banage