Tarun Bharat

राज्यातील जनतेला ‘शॉक’

Advertisements

वीज दरात प्रतीयुनिट सरासरी 35 पैशांनी वाढ : 1 एप्रिलपासून दरवाढ लागू

प्रतिनिधी /बेंगळूर

पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याने नागरिकांच्या खिशावर अधिक ताण पडला आहे. दरम्यान, राज्यातील जनतेला वीज दरवाढीचा शॉक देण्यात आला आहे. प्रतीयुनिट सरासरी 35 पैसे वीज दरवाढ करण्यात आली असून 1 एप्रिलपासून दरवाढ लागू करण्यात आली आहे. कर्नाटक वीज नियंत्रण आयोगाचे (केईआरसी) हंगामी अध्यक्ष मंजुनाथ यांनी सोमवारी याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

राज्यातील सर्व वीज वितरण कंपन्यांनी प्रतीयुनिट सरासरी 1.85 रुपये वीज दरवाढ करावी, अशी मागणी केईआरसीकडे केली होती. मात्र, प्रतीयुनिट वीजदर 5 पैसे वाढ करण्यात आली असून फिक्स्ड चार्ज प्रती कि. वॅट/के. व्ही. ए. साठी 10 रुपयांपासून 30 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सरासरी 35 पैसे दरवाढ झाली आहे. मागील वर्षी 30 पैसे वीज दरवाढ करण्यात आली होती. हेस्कॉमने प्रतीयुनिट 2 रु. 17 पैसे वीजदरवाढीला (29.33 टक्के) परवानगी द्यावी, असा प्रस्ताव काही दिवसांपूर्वी वीज नियंत्रण आयोगाकडे पाठविला होता.

सरकारकडून मान्यता मिळविलेल्या लघू आणि सुक्ष्म उद्योगांना कोरोना परिस्थितीमुळे आर्थिक सुधारणेसाठी मदत म्हणून वर्षभरापर्यंत प्रतीयुनिट 50 पैसे सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या किनारपट्टीपासून 5 कि. मी. पर्यंतच्या बर्फ उत्पादन केंद्रे आणि शीतगृहांसाठी वापरल्या जाणाऱया वीज शुल्कात प्रतीयुनिट 1 रुपया सवलत देण्यात येणार आहे. इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग केंद्रांना पुरवठा होणाऱया वीजदरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

2022-23 या वर्षात 2,159.48 कोटी रुपयांची तूट भरून काढण्यासाठी वीजदरवाढ अनिवार्य आहे. या रकमेत 2020-21 या वर्षातील 1,700 कोटी रुपयांचाही समावेश आहे. सर्व वीज वितरण कंपन्यांच्या उत्पन्नात एकूण 3,143.16 कोटी रुपयांची घट झाली आहे. ही तूट 2022 आणि 2023 या वर्षात भरून काढण्याची परवानगी वीज वितरण कंपन्यांना देण्यात आली आहे.

सर्वसामान्यांची फरफट…

कोरोना परिस्थितीतून सावरत असलेल्या सर्वसामान्य जनतेला एकामागून एक दरवाढीचे झटके बसत आहेत. दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत आहेत. पेट्रोल-डिझेल, गॅस, दूध दरवाढीमुळे हैराण झालेल्या जनतेला आता राज्य सरकारने वीज दरवाढीचा शॉक दिला आहे. सातत्याने होणाऱया दरवाढीमुळे सर्वसामान्यांची फरफट होत आहे.

Related Stories

17 मे नंतर बेंगळुरात कोरोनाची दुसरी लाट ओसरणार?

Amit Kulkarni

कर्नाटक: मंत्री सुरेश कुमार यांनी शाळांना दिल्या भेटी

Archana Banage

कर्नाटक: सरकारी डॉक्टरांचा चौथ्या दिवशी संप मागे

Archana Banage

कर्नाटक: कन्नड चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी मिळणार; सरकार समर्पित फिल्म प्रमोशन बोर्ड स्थापन करणार

Archana Banage

सैन्य भरती सीईई पुढे ढकलली

Archana Banage

उर्वरित वर्ग सुरू करण्याचा निर्णय 16 रोजी

Amit Kulkarni
error: Content is protected !!