Tarun Bharat

राज्यातील दहावीचा निकाल ‘या’ दिवशी लागण्याची शक्यता

ऑनलाईन टीम / मुंबई


कोरोना संसर्गामुळे समाजातील इतर घटकाबरोबर शालेय विद्यार्थ्यांवर ही परिणाम झाला असून यामुळे अभ्याक्रम शिकवण्यापासून ते निकाल लागेपर्यंतच्या नियोजनात बदल करणे प्रशासनाला भाग पडले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील दहावीचा {एसएससी }चा निकाल कधी लागणार या वरुन विद्यार्थी, पालक यांच्यासह शिक्षकांमध्ये ही संभ्रम अवस्था होती. याला आता पुर्णविराम मिळणार असून दहावीच्या निकालाची संभाव्य तारीख २३ जुलै २०२१ निश्चित झाली आहे. तसेच या दिवशी दहावीचा निकाल महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर होण्याची शक्यता आहे. अशी माहिती पुणे बोर्डाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

राज्यातील एसएससी परीक्षेचा निकाल हा नववी आणि दहावीच्या अंतर्गत परीक्षेत विद्यार्थ्यांना मीळालेल्या गुणांच्या आधारे दिला जाणार आहे. या साठी नववीचे ५० % गुण, दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे ३० % गुण आणि दहावीतील प्रकल्प आदींचे २० % गुण मिळवून निकाल तयार केले जाणार आहे. याच बरोबर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे मूल्यांकन कसे होणार ? याबाबत अधिक माहितीसाठी विद्यार्थी mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन माहिती घेऊ शकतात.

Related Stories

महिलांबद्दल अपशब्द बोललोच नाही, पण…; अब्दुल सत्तार

Archana Banage

पुणे विभागातील 98,618 रुग्ण कोरोनामुक्त! 

Tousif Mujawar

बिनधास्त लोक…सुसाट कोरोना

Patil_p

दुसरा डोसचा कालावधी वाढल्याने लसीकरण केंद्रे पडली ओस

Patil_p

कोणाला हनुमान चालीसा वाचायची असेल तर आपल्या घरी वाचावी – गृहमंत्री

Archana Banage

टिकेची झोड उठल्यानंतर मुख्याधिकाऱयांचा निर्णय मागे

Patil_p