Tarun Bharat

राज्यातील निवडणुकांच्या तोंडावर, गोव्याचे मुख्य निवडणुक अधिकारी आणि कू यांनी सुरू केले अभियान, मतदानाला देणार प्रोत्साहन

Advertisements

निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास बळकट करत मतदारांना योग्य निर्णय घेण्यास मदत करण्याचा हेतू

पणजी / विवेक पोर्लेकर

येत्या 14 फेब्रुवारीला गोव्यात विधानसभा निवडणुक होत आहे. यानिमित्ताने गोव्याचे मुख्य निवडणुक अधिकारी आणि बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ‘कू’ यांनी #PledgeToVote हे अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून जनसामान्यांना मतदानाचे मोल समजावले जाईल आणि सोबतच मतदान करण्याबाबत प्रोत्साहितही केले जाईल. विशेष म्हणजे, हे करण्यासाठी पतंग बनवणे, टी-शर्ट डिझाइन करणे, मेहंदी आणि रांगोळीसारख्या कलात्मक माध्यमातून हे केले जाईल. #NoVoterToBeLeftBehind आणि #GoVoteGoa अशा हॅशटॅग्जच्या माध्यमातूनही गोव्याचे निवडणूक अधिकारी प्रभावीपणे सामान्यांपर्यंत पोचत आहेत. या कोरोनाच्या काळात निवडणूक आयोग जनतेच्या सुरक्षेसाठी कुठली काळजी घेत आहे, याबाबतचेही व्हिडिओज निवडणूक अधिकारी लोकांपर्यंत पोचवत आहेत.

‘कू’ अँप एक तटस्थ आणि पारदर्शक मंच म्हणून, लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास वाढवण्याचे सतत प्रयत्न करत आहे. सामान्यांची आदर्श निवडणुक प्रक्रियेबाबत साक्षरता वाढावी यासाठी ‘कू’ विविध मोहिमा राबवत आहे. ‘कू’ ने नुकतेच ‘कू-मतदार मार्गदर्शक’ ही प्रकाशित केले. यात मतदारांचे हक्क आणि जबाबदाऱ्यांविषयी मराठीसह विविध भाषांमध्ये माहिती दिली गेली आहे. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांनी योग्य निर्णय घ्यावेत यासाठी यात सविस्तर विवेचन केले आहे.

‘कू’ याबाबत बोलताना ‘कू’चे प्रवक्ता म्हणाले, “मतदान हा लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला दिलेला मुलभूत अधिकार आहे.प्रत्येक मताचे स्वत:चे असे एक महत्त्व आहे. गोव्याच्या मुख्य निवडणुक अधिकाऱ्यांसोबत #PledgeToVote अभियानाच्या माध्यमातून संयुक्तपणे अभियान राबवण्याची संधी मिळणे हा एक सन्मान आहे. यामाध्यमातून सामान्यांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास वाढेल आणि लोकांना मतदानासाठी प्रोत्साहन मिळेल. निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे आम्ही पालन करू. समाजात सकारात्मक आणि पुरोगामी बदल घडवण्यास ‘कू’ अॅपचा पुरेपुर उपयोग करण्याची खात्री आम्ही देतो.

Related Stories

नेवरा खाजन बांधाच्या दुरुस्तीत दिरंगाई

Amit Kulkarni

शिमगोत्सव किमान सात ठिकाणी आयोजित करावा

Amit Kulkarni

आमदार अपात्रतेवर 26 रोजी अंतिम निवाडा

Amit Kulkarni

कारमधील किमती वस्तू चोरणाऱया टोळीचा पर्दाफाश

Amit Kulkarni

शिरवडेचे कंपेशन एफसीवर 10 गोल; एफसी गोवाची विजयी सलामी

Amit Kulkarni

कोलवा येथील सिल्व्हर सँड हॉटेलवरील कारवाई लांबणीवर

Amit Kulkarni
error: Content is protected !!