Tarun Bharat

राज्यातील पहिला विवो स्मार्ट फोन स्टोर साताऱयात

प्रतिनिधी/ सातारा

मोबाईल म्हटलं की बालाजी मोबाईल असा लाखो ग्राहकांचा दृढविश्वास प्राप्त केलेल्या साताऱयातील भव्य बालाजी मोबाईलच्या शोरुमध्ये बुधवार दि. 8 रोजी पासून महाराष्ट्रातील पहिल्याच एक्सक्लूसिव्ह विवो स्मार्ट फोन स्टोर व लॅपटॉपचे भव्य शोरुमचा उद्घाटन सोहळा सायंकाळी 6 वाजता मान्यवरांच्या उपस्थित होणार असल्याचे संतोष शेडगे व कौस्तुभ सातपुते यांनी सांगितले.

लवकरच श्री गणेशाचे आगमन होत असून या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या गणेशोत्सव बालाजी मोबाईल, लॅपटॉप संगे साजरा करण्यासाठी एक्सक्लूसिव्ह विवो स्मार्ट फोन स्टोर व लॅपटॉपचे भव्य शोरुम सुरु होत आहे. त्याचे उद्घाटन आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते होणार असून यावेळी बालाजी ट्रस्टचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चोरगे, गणेश राजोपाध्ये, विवो डी जी एम टर्मिनल हेड मनोज कुमार व डी जी एम रिटेल हेड सुरेश कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

बालाजी मोबाईलने आपल्या लाखो ग्राहकांच्या मागणी नुसार बालाजी मोबाईल लॅपटॉप बरोबर महाराष्ट्र मधील प्रथम सुविधापूर्ण विवो मोबाईल शोरूम चालू करत आहे. यंदाच्या गणपती उत्सव मुहूर्तावर सातारावासियांच्या गरज पूर्ण करण्यासाठी मोबाईल, LED TV सह आत्ता विविध कंपनी चे HP, Lenovo, Asus,Dell आणि Macbook नामांकित लॅपटॉप सुविधा सेवा सुरू करत आहे. तसेच प्रिंटर सह लॅपटॉप, अकॅसेसेरीही उपलब्ध करण्यात येत आहे.

या जोडीला प्रथमच खास VIVO Mobile शोरुमची सुरुवात होत असून या नाविन्यपूर्ण अद्यावत सेवांचा लाभ ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन संतोष शेडगे व कौस्तुभ सातपुते यांनी केले आहे.

Related Stories

बोगस महिला डॉक्टरचा पर्दाफाश; कोरोना रुग्णांवर करत होती उपचार

datta jadhav

मराठमोळा मल्ल राहुल आवारे यांची जागतिक कुस्ती चषक स्पर्धेसाठी निवड

Archana Banage

कासमधुन अपुरा पाणी पुरवठा

Patil_p

महाराष्ट्रात काल 7,620 रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar

शाहूपुरीच्या विकासात कुठेही कमी पडणार नाही

Patil_p

Satara : किराणा मालाच्या दुकानातून तब्बल १ लाख ४५ हजार रुपयांचा गुटखा जप्त

Abhijeet Khandekar