Tarun Bharat

राज्यातील भाजप नेतृत्व बदलाच्या चर्चेला प्रदेशाध्यक्षांकडून पूर्णविराम

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात भाजप नेतृत्व बदलाच्या चर्चेला कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी पूर्ण विराम दिला आहे. त्यांनी राज्यात नेतृत्व बदल होणार नाही. येडियुरप्पा हेच मुख्यमंत्री म्हणून आपला कार्यकाळ पूर्ण करतील, असे म्हंटले आहे.

दरम्यान , राज्य भाजपमध्ये अंतर्गत कलह सुरु असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी शुक्रवारी बी. एस. येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदी कायम राहतील, असे प्रतिपादन केले आणि पक्षाच्या सर्व आमदारांना कोविड-१९ व्यवस्थापनासाठी काम करण्यास सांगितले.
तसेच येडियुरप्पा यांच्या मुलाने भाजप उपाध्यक्ष बी वाय. विजयेंद्र यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याच्या वक्तव्यावर बोलताना नलिनकुमार यांनी पर्यटनमंत्री सी. पी. योगेश्वर यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले जाईल, असेही ते म्हणाले.

येडियुरप्पा आमचे एकमताने नेते आहेत. त्यातही कोणताही बदल होणार नाही, असेही केंद्रीय नेतृत्वाने स्पष्ट केले आहे. आणि पक्षाच्या आत किंवा बाहेर याविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही, ”असे नलिनकुमार म्हणाले.

यावेळी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक घेण्याची शक्यताही नलिनकुमार यांनी फेटाळून लावली. “कोविड -१९ संपेपर्यंत पक्ष कोणतीही बैठक बोलावणार नाही. कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने, आम्ही जे काही आहे त्यावर चर्चा करू, असे ते म्हणाले. दरम्यान, येडियुरप्पा यांनी ही बैठक घ्यावी, अशी भाजपच्या एका गटाच्या आमदारांची मागणी आहे.

Related Stories

रस्त्यावर पडलेली माती काढण्यावरून दोन कुटुंबात हाणामारी

Abhijeet Shinde

अलमट्टी धरण ५१ टक्के भरले; वारणा, कोयना धरण साठ्यातही वाढ

Abhijeet Shinde

कोरोना चाचण्यांचा अहवाल विलंबाने दिलेल्या 40 लॅबना दंड

Amit Kulkarni

नाईट कर्फ्यूचा निर्णय येडियुराप्पांचा नव्हे !

Omkar B

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपुर्वी रक्तदान करा : आरोग्यमंत्री

Abhijeet Shinde

आणखी किती वर्षे टोल जमा होणार?

Amit Kulkarni
error: Content is protected !!