Tarun Bharat

राज्यातील मठ-मंदिरांसाठी

88.75 कोटी रु.अनुदान

बेंगळूर

 राज्य सरकारने धर्मादाय खात्याच्या कक्षेत येणाऱया मठ, मंदिरे, धार्मिक संस्थांसाठी 88.75 कोटी रुपये अनुदान मंजूर केले आहेत. 2019-20 या वर्षातील अर्थसंकल्पामध्ये मठ-मंदिरांसाठी अनुदानाची तरतूद केली असली तरी अनुदान मंजूर झाले नव्हते. आता मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी अनुदान मंजूर करण्याची सूचना अर्थ खात्याला दिली आहे, अशी माहिती धर्मादायमंत्री कोटा श्रीनिवास पुजारी यांनी दिली.

राज्य सरकारने 2019-20 या वर्षातील अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे 39 मठांना प्रत्येकी 1 कोटी रुपये, 143 मठ आणि मंदिरांच्या ट्रस्टना 49.75 कोटी रुपये मंजूर केले आहेत. बुद्ध बसव आंबेडकर प्रतिष्ठान- चित्रदुर्ग, जगद्गुरु चालुवाडी पीठ- तुमकूर, सिद्धरामेश्वरस्वामी ट्रस्ट- शिमोगा, मुरुघ मठ- धारवाड, सिद्धगंगा मठ- तुमकूर आणि पुष्पगिरी महासंस्थान मठ- बेंगळूर यांना प्रत्येकी 1 कोटी रु. अनुदान देण्यात आले आहे. सरकारने अनुदान मंजूर केल्याबद्दल धर्मादायमंत्री कोटा श्रीनिवास पुजारी यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

राज्य सरकारने यापूर्वी मंदिरे आणि धार्मिक संस्थांसाठी आर्थिक साहाय्य करण्याचे आश्वासनही दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने अलिकडेच धर्मादाय खात्याच्या अखत्यारित येणाऱया मंदिरांमधील पुजारी व इतर कर्मचाऱयांना पेन्शन, विमा सुविधा पुरविण्याबाबत चर्चा सुरू केली आहे. लवकरच याबाबतही निर्णय होण्याची शक्यता आहे.

Related Stories

बेंगळूरने गाठला एक लाख कोरोना रुग्णांचा टप्पा

Archana Banage

मुख्यमंत्र्यांची आज मंत्रिमंडळासोबत बैठक

Archana Banage

बेंगळूर: केआर मार्केट ३१ ऑगस्टपर्यंत बंद : पालिका आयुक्त

Archana Banage

रेल्वेची संरक्षक भिंत कोसळण्याच्या स्थितीत

Rohit Salunke

कारवार येथे पॅराग्लायडिंग दरम्यान नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू

Archana Banage

दहावीचा निकाल 10 ऑगस्ट रोजी

Amit Kulkarni