Tarun Bharat

राज्यातील रिक्त सरपंच, उपसरपंच पदांची होणार निवड

Advertisements

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

प्रतिनिधी / कोल्हापूर

राज्यात काही ग्रामपंचायतींच्या रिक्त असलेल्या सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडी करण्यासाठी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी परवानगी दिली आहे. या निवडीसाठी आवश्यक असलेली ग्रामपंचायतीची बैठक घेण्यास संमती दिली आहे. या बैठका कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करुन घ्याव्यात, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीशी संबंधीत कामकाज स्थगित करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने 17 मार्च 2020 रोजी आदेश दिले होते. पण राज्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये त्यापुर्वीच सरपंच, उपसरपंचांचे राजीनामे झाले आहेत. अशा ग्रामपंचायतींमध्ये आता नवीन सरपंच, उपसरपंचांची निवड करावयाची आहे. विशेषतः कोल्हापूर जिह्यातून याबाबत विचारणा होत आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यातील ज्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंच यांच्या राजीनाम्यामुळे किंवा इतर कारणाने ही पदे रिक्त झाली आहेत, त्या ग्रामपंचायतींमध्ये या पदांची निवड होण्यासाठी ग्रामपंचायतीची बैठक घेण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱयांना दिल्या आहेत. यासाठी संबंधीत तहसीलदारांना निर्देश द्यावेत व सरपंच, उपसरपंच पदांची निवड करावी, तसेच या बैठका घेताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करावे, अशाही सूचना दिल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

या संदर्भातील शासन आदेश निर्गमित करण्यात आला आहे. कोल्हापूर जिह्यातील ग्रामपंचायतींकडून सरपंच व उपसरपंच निवडीबाबत वारंवार विचारणा होत आहे. ग्रामपंचायतींच्या मासिक सभेत सरपंच व उपसरपंच यांच्या राजीनाम्याचे वाचन झाल्यानंतर नवीन सरपंच व उपसरपंच निवडीच्या आदेशासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केले जात आहेत. त्यानुषंगाने ग्रामपंचायतींनी मासिक सभेमध्ये या पदांच्या निवडणूक विषयक कामकाज घ्यावे किंवा कसे याबाबत कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी शासनाकडे मार्गदर्शन मागवले होते. त्यानुषंगाने आता राज्यात ग्रामपंचायतींच्या रिक्त असलेल्या सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडी होण्यासाठी आवश्यक असलेली ग्रामपंचायतीची बैठक घेण्यास संमती देण्यात आली आहे.

Related Stories

…तर आमचेही हात बांधलेले नाहीत

datta jadhav

भरणेतील नव्या जगबुडी पुलाशेजारील दुसऱ्या पुलाचे काम जोमात

Abhijeet Shinde

शिरगावात एकाच घरातील तब्बल 20 जण पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने 27 जणांचा मृत्यू, 470 नवे रुग्ण

Abhijeet Shinde

कोल्हापूर भाजपमध्ये अंतर्गत वाद? महिला पदाधिकाऱ्यांची चंद्रकांत पाटलांकडे तक्रार

datta jadhav

शिंदे गटाकडून शिवसेनेची नवी कार्यकारिणी जाहीर

datta jadhav
error: Content is protected !!