Tarun Bharat

राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता १० जूनपासून


मुंबई \ ऑनलाईन टीम

राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता १० जूनपासून सुरू होणार आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी ही माहिती दिली. राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षांसंदर्भात आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांच्यासोबत बुधवारी मुंबईतील मंत्रालयात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.

या परीक्षांमध्ये एम.बी.बी.एस., बी.डी.एस., बी.ए.एम.एस., बी.यु.एम.एस., बी. एच.एम.एस.,बी.पी.टी.एच., बी.ओ. टी.एच. आणि बीएससी नर्सिंग या पदवी परीक्षांच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षांचा समावेश आहे.या वैद्यकीय पदवी परीक्षांसोबतच मॉडन मिड लेव्हल सर्व्हिस प्रोव्हायडर कोर्स तसंच सर्टिफिकेट कोर्स इन फर्माकॉलॉजी या परीक्षाही या कालावधीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी हा निर्णय घेतला होता.

Related Stories

मागासवर्गीयांच्या ज्येष्ठतेनुसार पदोन्नतीचा मार्ग मोकळा

Amit Kulkarni

9 मे पर्यंत युद्ध संपविण्याचे रशियन सैन्याला आदेश

datta jadhav

एमएलजी हायस्कूल ते ‘ऑस्कर’ व्हाया जे. जे. आर्टस्

Archana Banage

सुधीर मुनगंटीवार अन् आता नाना पटोले चर्चेत; भाजपच्या ‘वंदे मातरम्’नंतर, काँग्रेसचं ‘जय बळीराजा

Abhijeet Khandekar

कोरोनाबाधित 18 हजारहून अधिक

Patil_p

नव्या नियमावलीविरोधात व्हॉट्सॲप दिल्ली उच्च न्यायालयात

datta jadhav