Tarun Bharat

राज्यातील शाळांना उन्हाळ्य़ाची सुट्टी जाहीर

2 मे ते 12 जूनपर्यंत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी

कोल्हापूर प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालयाने राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळय़ाची सुट्टी जाहीर केली आहे. 2 मे ते 12 जूनपर्यंत शाळांना उन्हाळय़ाची सुट्टी आहे. तर 13 जूनपासून 2022-23 नवीन शैक्षणिक वर्षाला सुरूवात होत आहे, याची नोंद राज्यातील शाळांनी घ्यावी, असे परिपत्रक राज्य माध्यमिक व उच्च माध्यकि शिक्षण संचालक महेश पालकर व प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी जाहीर केले आहे.

जून महिन्यातील विदर्भातील तापमान पाहता तेथील शाळा नवीन शैक्षणिक वर्ष 2022-23 वर्षातील 27 जूनपासून सुरू होतील. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱयांच्या परवानगीने उन्हाळा व दिवाळीची सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अगर नाताळच्या सणावेळी सुट्टी द्यावी. माध्यमिक शाळा संहिता नियमानुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्टय़ा 76 दिवसापेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता शाळांनी घ्यावी. पुढील शैक्षणिक वर्षापासून यापुढे दरवर्षी राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जून महिन्यातील दुसऱया सोमवारी त्या दिवशी सुट्टी असल्यास आणि विदर्भातील तापमान विचारात घेता जून महिन्यातील चौथ्या सोमवारी सुट्टी असल्यास त्याच्या दुसऱया दिवशीपासून शाळा सुरू करावी. यंदा उन्हाळयाची सुट्टी सव्वा महिना राहणार आहे. तयी शाळा व शिक्षकांनी याची दखल घ्यावी, असे आवाहन राज्य शिक्षण संचालनालयाने केले आहे.

Related Stories

सांगलीत एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

Abhijeet Khandekar

फलटणच्या अनिशची राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी

Patil_p

नवीन वर्ष कसे साजरे करणार ? महाराष्ट्र सरकारकडून गाईडलाईन जारी!

Tousif Mujawar

महाराष्ट्र : मागील 24 तासात 161 पोलिसांना कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

खा. धैर्यशील माने यांना बेळगावात प्रवेशबंदी

Rohit Salunke

कोल्हापूर शहरात स्वतंत्र युनिट करुन दुकाने सुरु करा

Archana Banage