Tarun Bharat

राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था 31 जुलैपर्यंत बंद

शिक्षकांना घरातूनच काम करण्याची सूचना

प्रतिनिधी/ पणजी

राज्यातील सर्व विद्यालये शैक्षणिक संस्था व प्रशिक्षण संस्था 31 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश राज्य शिक्षण शिक्षण संचालनालयाने जारी केले आहे. राज्यातील काही विद्यालयांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कारोना पॉझिटिव्ह सापडल्याने अखेर शिक्षण खात्याने विद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला. शिक्षकांना नाहक विद्यालयांमध्ये बोलावून धोका पत्करला जात असल्याबद्दल गोवा फॉरवर्डसह अन्य पक्षानीही आवाज उठविला होता.

मात्र ऑनलाईन आणि दूरस्थ शिक्षणाला प्रोत्साहन द्यावे, असेही सूचित करण्यात आले आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शक्यतो घरातूनच काम करतील. अकारण त्यांना विद्यालयांमध्ये बोलावले जाऊ नये. शिक्षण खात्याने जारी केलेल्या परिपत्रकात अनेक मार्गदर्शकतत्त्वे नमूद केली असून या मार्गदर्शकतत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याची सूचना केली आहे.

शिक्षकांचे संपर्क नंबर जवळ ठेवा

संस्थांचे प्रमुख किंवा व्यवस्थापनाने सर्व शिक्षकांचे संपर्क नंबर जवळ ठेवावे जेणेकरून आवश्यक असेल त्यावेळी त्यांच्याशी संपर्क साधता येईल. संस्था प्रमुखांनी विद्यार्थ्यांकडे ऍनड्राईड मोबाईल फोन तसेच नेटवर्कची सुविधा उपलब्ध आहे का याची माहिती शिक्षकांकडून उपलब्ध करावी. 4 जून ते आतापर्यंतच्या ऑनलाईन क्लासेस व पूर्ण केलेला अभ्यासक्रम याची माहिती शिक्षकांकडून घ्यावी. आठवडय़ासाठी ऑनलाईन शिक्षणाच्या तयार केलेल्या आराखडय़ाची माहिती संस्था प्रमुखांनी उपलब्ध करून घ्यावी.

प्राथमिक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण नको

शिक्षकांनी घेतलेल्या ऑनलाईन प्रशिक्षणाचा उपयोग करून व्हिडिओ नोट्स, ऑनलाईन फॉर्म, प्रश्न व असाईन्मेंट तयार करावे. दिवसाला दोन तासापेक्षा जास्त काळ ऑनलाईन क्लासेस घेतले जाऊ नयेत, असेही मार्गदर्शक तत्वाद्वारे सूचित करण्यात आले आहे. व्हिडिओ, पॉवर पाईंट प्रेझेंटेशन, प्रश्नावली यांचा शिक्षणासाठी वापर केला जावा. प्राथमिक विद्यालयांमध्ये शिक्षण उपक्रमांवर आधारित वर्कशीट व सप्लिमेंटरी साहित्य पालकांपर्यंत पाठवावे. प्राथमिक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देऊ नये. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या संपर्कात रहावे.

नियंत्रण ठेवण्यासाठी समितीची स्थापना करा

पालक-शिक्षक संघटना, स्कूल व्यवस्थापन समिती किंवा परिसरातील लहान विद्यार्थ्यांना शिकवावे यासाठी शिक्षकांनी प्रोत्साहन द्यायला हवे. ज्या विद्यार्थ्यांपाशी मोबाईल नसेल त्या विद्यार्थ्यांला वर्कशीट व आवश्यक ते साहित्य पुरविले जावे. प्रत्येक संस्थेने ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षणावर नियंत्रण ठेवण्यासाठी समिती गठित करावी. त्यामध्ये संस्थाप्रमुख व्यवस्थापन सदस्य पालक-शिक्षक संघटना सदस्य यांचा समावेश असावा. ही समिती ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षणावर देखरेख ठेऊन विद्यार्थी, पालकांकडून प्रतिसाद मिळविणार आहे.

Related Stories

राज्यात एप्रिलमध्ये 52 मी.मी पावसाची नोंद

Patil_p

स्पंदन कला महोत्सवात कलाकारांना पुरस्कारानी सन्मानित

Patil_p

राज्य कार्यकारिणी बैठकीत केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव

Patil_p

स्व. मनोहर पर्रीकरांची तत्वनिष्ठा पुढे नेऊ- मंत्री मायकल लोबो

Amit Kulkarni

सरकारचे संवेदनशील विषयांकडे दुर्लक्ष

Patil_p

पर्वरी पोलीस वसाहतील इमारतींची दैयनीय अवस्था

Patil_p